छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधील एमआयडीसी वाळूज औद्योगिक नगरीत साडेचार हजार ते पाच हजारच्या जवळपास छोटे-मोठे कारखाने वसलेले आहेत आणि याच औद्योगिक वसाहतीलगत अनेक कामगार वसाहतीसुद्धा वसलेल्या आहेत. एमआयडीसी वाळूज औद्योगिक परीक्षेत्रातील काही निवडक कंपन्यांतून रात्री-अपरात्री उग्र आणि विषारी वायू प्रदूषण होत असल्याने कामगार वसाहतीतील नागरी रहिवाशांना श्वसन करण्यास त्रास होत आहे उग्र आणि विषारी वायू प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर प्रदूषण नियंत्रण महामंडळाने कार्यवाही करावी अशी मागणी रहिवासी कामगार वर्गातून केली जात आहे.
महत्त्वाचे मुद्दे -
- वाळूज औद्योगिक नगरीत प्रदूषण वाढले
- विषारी, उग्र वासामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
- प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे दुर्लक्ष