मुंबई : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख आणि परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा यासाठी आज मुंबईत 'सर्वपक्षीय जन आक्रोश मोर्चा'चे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात दोन्ही कुटुंबांना तातडीने न्याय द्यावा, बीड प्रकरणी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा, वाल्मिक कराडसह अन्य आरोपींची संपत्ती जप्त कराव्यात अशा मागण्या आदोलकांनी केल्या.
हेही वाचा : सरकारी नोंदींप्रमाणे मराठ्यांना कुणबी आरक्षण द्या; जरांगेंची मागणी
बीड आणि परभणीमधील घटनांची धग राज्याच्या राजधानीत पोहचल्यावर आंदोलक अधिक आक्रमक झाले. याप्रकरणी सरकारने अधिक वेगाने तपास करण्याची मागणी यावेळी राजकीय नेत्यांनी लावून धरली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
देशमुख कुटुंबियांच्या मागण्या
कराडवर हत्येचा गुन्हा दाखल करा. हत्या प्रकरणाच्या सीआयडी तपासाची माहिती कुटुंबियांना द्यावी. सरकारी वकील उज्ज्वल निकम किंवा सतीश मानशिंदे यांची नेमणूक करावी. हत्याप्रकरणी आरोपी कृष्णा आंधळेला अटक करावी. एसआयटी समितीत पंकज कुमावत यांची नियुक्ती करावी. अशा मागण्या देशमुख कुटुंबियांनी केली आहे.
बीड प्रकरणी आत्तापर्यंत काय कारवाई झाली त्याची माहिती सरकारने उघड करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे. देशमुख यांच्या हत्येनंतर सुरू असलेले आक्रोश मोर्चे दोषींनी फासावर लटकवल्याशिवाय शांत होणार नसल्याचा दावा भाजपा आमदार सुरेश धस यांनी सांगितलं आहे. बीडमधील सरपंचाची हत्या आणि परभणीत कोठडीत झालेल्या मृत्यू प्रकरणी दोषीवर कारवाई करण्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. या घटनेमुळे मुंडे यांचे बीडचे पालकमंत्रीपदही हुकले आहे. बीड प्रकरणी धनंजय मुंडे यांच्या राजानाम्याची मागणी सातत्याने होत आहे.