Saturday, February 08, 2025 07:00:40 PM

Kolhapur
रुग्णवाहिका खड्ड्यात आपटली अन् आजोबा झाले जिवंत....

कोल्हापूर जिल्ह्यात आश्चर्यचकित करणारी घटना पाहायला मिळाली आहे.

रुग्णवाहिका खड्ड्यात आपटली अन् आजोबा झाले जिवंत

कोल्हापुर : आजवर रस्त्यावरील खड्डे हे अनेकांसाठी जीवघेणे ठरलेले आहेत. पण कोल्हापुरात अशाच एका खड्डयात रूग्णवाहिका आपटल्याने एका आजोबांना चक्क जीवदान मिळालं आहे. या चमत्कारीत घटनेने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. कसबा बावडा येथील रहिवासी पांडुरंग उलपे यांना रुग्णालयाने मृत घोषित केलं होतं. त्यांचा मृतदेह घरी आणताना रूग्णवाहिका रस्त्यात असलेल्या खड्ड्यात आपटली. त्याच्या झटक्याने उलपे आजोबा जिवंत झाले. कोल्हापूरकरांमध्ये या घटनेची सर्वत्र चर्चा आहे.  

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

कसबा बावडा येथील राहणारे पांडुरंग (तात्या) उलपे यांना चक्कर आली. त्यानंतर त्यांना दवाखान्यात ऍडमिट करण्यात आले. दवाखान्यात पंधरा दिवसा झाल्यानंतर डॉक्टरने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. त्यांना घरी घेऊन जाण्यासाठी डॉक्टरांनी सांगितले. घरच्यांनी अंत्यविधीची तयारी केली. पाहुणे जमू लागले पण दवाखान्यातून घरी आणत असताना कसबा बावड्यातील स्पीड बेकर आणि खड्डा हा त्यांना जीवदान देणारा ठरला. त्यांची थोडीफार हालचाल झाली. या हालचालीने नातवाने त्यांना पुन्हा एकदा दवाखान्यात नेले. तर आज पांडुरंग उलपे हे घरच्यांच्या बरोबर जेवण करत आहेत.

हेही वाचा : नवीन वर्षातील पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय

कोल्हापुरातील खड्ड्यांमुळे एकाला जीवदान जरी मिळाला असेल तरी कोल्हापुरातील रस्ते कधी सरळ होतील याकडेच सर्व नागरिकांचे नजरा आहेत.दुसरीकडे पांडुरंग उलपे जिवंत झाल्याने चमत्कार झाल्याची चर्चा नागरिकांकडून होत आहे.

खड्ड्याने दिलं जीवदान

हरिनामाचा जप करताना 16 डिसेंबरला पांडुरंग उलपे यांना हृदयविकाराचा झटका आला. कुटुंबीयांनी तातडीने पांडुरंग उलपे यांना रूग्णालयात हलवले. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. डॉक्टरांनी पांडुरंग उलपे यांनी मृत घोषित केले. कुटुंबीयांनी पांडुरंग उलपे यांच्या अंत्यविधीची तयारी सुरू केली. त्यांचा मृतदेह रूग्णालयातून घरी आणताना रूग्णवाहिका एक खड्ड्यात आपटली. त्याच्या झटक्याने पांडुरूंग उलपे हालचाल करू लागले. त्यांच्या नातवाच्या ही बाब लक्षात येताच आजोबांना पुन्हा रूग्णालयात दाखल केले. पुढील उपचारानंतर उलपे यांची प्रकृती सुधारली, त्यांना रूग्णालयातून घरी पाठव्यात आलं. आता ते त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहेत, या चमत्काराची सर्वत्र चर्चा आहे.

 

 


सम्बन्धित सामग्री