Wednesday, November 19, 2025 03:59:36 AM

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा दोन दिवसीय महाराष्ट्र दौरा

देशाचे गृहमंत्री अमित शाह यांचा मंगळवारी महाराष्ट्र दौरा असणार आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा दोन दिवसीय महाराष्ट्र दौरा

मुंबई : देशाचे गृहमंत्री अमित शाह यांचा मंगळवारी महाराष्ट्र दौरा असणार आहे. आगामी निवडणुकीच्या दृष्टीकोनातून अमित शाह यांचा महाराष्ट्र दौरा महत्त्वाचा असणार आहे. केंद्रीय गृहमंत्री शाह यांच्या उपस्थितीत भाजपाचा मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्याला भाजपाचे प्रमुख नेते, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. अमित शाह यांची महायुतीच्या नेत्यांसोबत बैठक होणार आहे तसेच  दुपारी खासदार, आमदारांसोबत बैठक पार पडणार आहे. दौऱ्यादरम्यान ते मुंबईतल्या जागांचा आढावा घेतील. त्याचबरोबर नेते व कार्यकर्ते यांना कानमंत्र देऊ शकतात.  


सम्बन्धित सामग्री