Saturday, February 08, 2025 04:04:24 PM

National Edible Oil Campaign
राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत 28 जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार

अन्न आणि पोषण सुरक्षा-कडधान्य, भात व गहू तसेच राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-गळीतधान्य अंतर्गत महाडीबीटीवर सिंचन साधने (पाईप व पंप) या घटकांचे  लक्षांक भरण्यात आले आहेत.

राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत 28 जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार

मुंबई : अन्न आणि पोषण सुरक्षा-कडधान्य, भात व गहू तसेच राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-गळीतधान्य अंतर्गत महाडीबीटीवर सिंचन साधने (पाईप व पंप) या घटकांचे  लक्षांक भरण्यात आले आहेत. तरी, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी https://mahadbt.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर २८ जानेवारी, २०२५ पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

तसेच कडधान्यामध्ये  बीज प्रक्रिया ड्रम (seed treatment drum), पौष्टिक तृणधान्य अंतर्गत (pulveriser) व राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-गळीतधान्य अंतर्गत मनुष्यचलित टोकन यंत्र (Dibbler), मनुष्यचलित सायकलवर चालणारे सिड ड्रील (Seed drill), छोटे तेल घाणा सयंत्र (oil extraction unit ) या घटकांचे  लक्षांक भरण्यात आले आहेत. बाबींसाठी लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर केलेल्या अर्जातून ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. त्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर बाबींच्या टाईल्स उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. यांत्रिकीकरण व सिंचन (Mechanization and Irrigation) या टाईल अंतर्गत शेतकऱ्यांना अर्ज करता येतील.  जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.  अधिक माहितीसाठी विभागीय कृषी सह संचालक / जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी / उप विभागीय कृषी अधिकारी / तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही विभागामार्फत कळविण्यात आले आहे.


हेही वाचा : दावोसमध्ये झालेल्या सामंजस्य करारातून 15.95 लाख रोजगारनिर्मिती होणार

 


सम्बन्धित सामग्री