Wednesday, January 15, 2025 06:57:25 PM

Ashwini Bhide
प्रधान सचिव म्हणून अश्विनी भिडेंची नियुक्ती; मेट्रोतून थेट मंत्रालयात

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक असणाऱ्या अश्विनी भिडे यांची बदली करण्यात आली आहे.

प्रधान सचिव म्हणून अश्विनी भिडेंची नियुक्ती मेट्रोतून थेट मंत्रालयात

मुंबई : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक असणाऱ्या अश्विनी भिडे यांची बदली करण्यात आली आहे. मेट्रोवूमन म्हणून कारकीर्द गाजवलेल्या अश्विनी भिडे यांची मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे अश्विनी भिडे आता थेट मेट्रोतून मंत्रालयात जाणार आहेत. मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम करताना त्यांनी उत्तमरित्या जबाबदारी सांभाळली. त्यामुळे मंत्रालयात प्रधान सचिव म्हणून मिळालेली नवीन जबाबदारी त्या कशी पार पाडतात? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.  

 

अश्विनी भिडे यांच्या नियुक्तीचे पत्र समोर आले आहे. या पत्रात शासनाने त्यांची बदली केली असल्याचे माहिती समोर आले आहे. यासोबत मंत्रालयात मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव म्हणून ब्रिजेश सिंह काम पाहत होते. त्यांच्या जागी आपली नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आपण ब्रिजेश सिंह यांच्याकडून त्वरित पदभार स्विकारावा असे आदेश देण्यात आले आहेत. त्यासोबतच पुढील आदेश येईपर्यंत मेट्रोतील संचालक पदाचा कार्यभारही सांभाळावा असे आदेश भिडे यांना देण्यात आले आहेत.

याआधी मुख्यमंत्री कार्यालयाचा पदभार हा ब्रिजेश सिंह पाहत होते. मात्र आता ब्रिजेश सिंह यांना पदापासून मुक्त करण्यात आले आहे. सिंह यांच्या जागी अश्विनी भिडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अश्विनी यांना त्वरित पदभार स्विकारण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


सम्बन्धित सामग्री