महाराष्ट्र: महाराष्ट्रात राजकीय नेत्यांची वक्तव्ये नेहमीच चर्चेत असतात त्यातच आता माजी मंत्री बच्चू कडू यांच्या वक्तव्याची सर्वत्र चर्चा होतेय. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सद्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी त्यांनी हे वक्तव्य केलंय. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना त्यांनी हे वक्तव्य केलंय. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावेत असं माजी मंत्री बच्चू कडू यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतांना वक्तव्य केलंय.
हेही वाचा: मुंबई लाईफलाईनचं रूप बदलणार
काय म्हणाले बच्चू कडू?
राजकीय संबंधांमुळे मी एकनाथ शिंदे यांना भेटायला आलो नाही. तर आज त्यांचा वाढदिवस आहे म्हणून शुभेच्छा देण्यासाठी आलो होतो. एकनाथ शिंदे यांच्यासारखा अतिशय दयाळू आणि मनमिळाऊ नेतृत्व या राज्याला कायम राहिले पाहिजे. त्यांच दिव्यांग मंत्रालय उभारणीमध्ये मोठा वाटा आणि श्रेय आहे, असे कौतुक करत शिंदे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत, अशी कामना त्यांनी व्यक्त केली. जर असं झाले तर महाराष्ट्राच अधिक चांगलं होईल असे देखील कडू म्हणाले.
हेही वाचा: Maha Khumbh Mela 2025: प्राजक्ता माळीने केले महाकुंभात शाहीस्नान
माजी मंत्री बच्चू कडू यांनी ठाण्यातील एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. यावेळी माध्यमांशी बोलतांना राजकीय संबंधांमुळे मी एकनाथ शिंदे यांना भेटायला आलो नाही. तर आज त्यांचा वाढदिवस आहे म्हणून शुभेच्छा देण्यासाठी आलो होतो. एकनाथ शिंदे यांच्यासारखा अतिशय दयाळू आणि मनमिळाऊ नेतृत्व या राज्याला कायम राहिले पाहिजे. त्यांच दिव्यांग मंत्रालय उभारणीमध्ये मोठा वाटा आणि श्रेय आहे, असे कौतुक करत शिंदे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत, अशी कामना त्यांनी व्यक्त केली. जर असं झाले तर महाराष्ट्राच अधिक चांगलं होईल असे देखील कडू म्हणालेत .