अमरावती : विदर्भातील सर्वात मोठी बहिरम यात्रेच्या निमित्ताने बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी माजी मंत्री आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी शंकरपटामध्ये भाग घेतला आणि अवघ्या 6.99 सेकंदात बाजी मारली. त्यांनी स्वतःची बैलजोडी हाकली आणि धूरकरी प्रमाणाच्या वेगाने शर्यतीत पल्ला गाठला. बच्चू कडू यांच्या या अफाट वेगाने बैलजोडीची शर्यत अवघ्या काही सेकंदातच संपली आणि त्यांनी शंकरपटातील शर्यत जिंकली.
👉👉 हे देखील वाचा : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला गोंदियात मोठं खिंडार
शंकरपटात जिंकलेल्या या शानदार विजयाबद्दल कडू यांना परिसरातील अनेकांनी कौतुक केलं. यावेळी त्यांनी उपस्थित लोकांना संबोधित करतांना म्हटलं, "ही 56 इंचाची छाती नाही, तर शेतकऱ्यांच्या मुलाची छाती आहे. बैल जोडी इतकी सुसाट पळली की ती रोकणं तुमच्या सामर्थ्यात नाही. तुम्ही बेइमानी केली, म्हणून मी हरलो, हे मताचे चोर आहेत."
ते पुढे म्हणाले, "आम्ही शेतकरी व शेतमजुरांसाठी लढत आहोत आणि आमचं प्रत्येक रक्त शेतकऱ्यांसाठी आहे." त्यांच्या या बोलण्यामुळे शेतकऱ्यांची जिद्द आणि संघर्ष यांना आणखी एक नवीन दिशा मिळाली आहे.बच्चू कडू यांनी ही शर्यत केवळ वेगानेच नाही, तर त्यांच्या आवाजाच्या ताकदीनेही जिंकली आणि शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढण्याची शपथ घेतली.
👉👉 जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.