माघी यात्रेत नारळ फोडण्यास बंदी – प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय!
शहरात मांस, मटन व मासे विक्रीवरही निर्बंध – आदेश निर्गमित
पंढरपूर : विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात माघी यात्रेच्या पार्श्वभूमीवर 8 आणि 9 फेब्रुवारी रोजी नारळ विक्री व फोडण्यावर बंदी घालण्यात आली आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 अंतर्गत कलम 163 अन्वये हा निर्णय लागू करण्यात आला आहे.
यात्रेदरम्यान मोठ्या संख्येने भाविक मंदिरात दर्शनासाठी येतात. गर्दीच्या पार्श्वभूमीवर कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. तसेच, 7 ते 9 फेब्रुवारी दरम्यान शहरातील मांस, मटन, मासे विक्री आणि प्राणी कत्तल यावरही बंदी लागू करण्यात आली आहे.
👉👉 हे देखील वाचा : छत्रपती संभाजीनगरात बिल्डरच्या 7 वर्षीय मुलाचे अपहरण – 2 कोटींच्या खंडणीची मागणी
या संदर्भात उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे यांनी अधिकृत आदेश निर्गमित केला आहे. भाविकांची सुरक्षितता आणि मंदिर परिसरातील स्वच्छता यासाठी हे निर्बंध घालण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. यात्रेच्या काळात नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
👉👉 जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.