कोल्हापूर: भाविकांचे श्रद्धा स्थान असलेल्या श्रीक्षेत्र ज्योतिबा मंदिर परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. ज्योतिबा मंदिर परिसरातील एका दुकानामध्ये विक्रीसाठी असलेल्या प्रसादाच्या खव्यामध्ये ब्लेड आढळल्याने एकच खळबळ उडालीय. कोल्हापूर येथील दख्खनचा राजा श्रीक्षेत्र ज्योतिबा मंदिर येथे दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात आणि प्रसाद खरेदी करत असतात. परंतु आता याच प्रसादाच्या खव्यामध्ये ब्लेड आढळल्याने भाविकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळतंय.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
प्रसादामध्ये काही आढळणे ही गोष्ट काही नवीन नाही. या आधीदेखील महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी प्रसादामध्ये भेसळ असल्याचं समोर आलंय. परंतु आता श्रीक्षेत्र ज्योतिबा मंदिर परिसरात प्रसादाच्या खव्यामध्ये ब्लेड आढळल्याने भाविकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळतंय.
याबाबत सविस्तर:
ज्योतिबा ग्रामपंचायतीचे माजी सदस्य सुनील नवाळे रविवारी खवा घेण्यासाठी गेले असता त्यांना खव्यामध्ये ब्लेडचा तुकडा आढळला. याची गंभीर दखल घेत त्यांनी या संदर्भातली तक्रार जिल्हा प्रशासनाकडे नोंदवलेली आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाने ज्योतिबा देवस्थान परिसरात असणाऱ्या सर्व दुकानांची तपासणी करून संबंधित दुकानदारावर कारवाई करावी; अशी मागणी त्यांनी केलेली आहे.