वाशिम : वाशिम जिल्ह्यातील बाभुळगावमध्ये एका मुलाचे अपहरण झाले होते. त्यामुळे बाभुळगावमध्ये खळबळ उडाली होती. आता त्या मुलाचा मृतदेह सापडला आहे.
वाशिम जिल्ह्यातील बाभुळगाव येथील 14 वर्षीय मुलाचे अपहरण झाले होते. अनिकेत सादुडे असे या मुलाचे नाव आहे. 12 मार्च रोजी रात्री गावातून अपहरण झाले होते. मुलाला सोडवण्यासाठी 60 लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. यानंतर नवव्या दिवशी मुलाचा मृतदेह सापडला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास चालू आहे.
हेही वाचा : मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणारी महिला अटकेत; प्रकरणात नवा ट्विस्ट
नेमंक काय झालं?
१२ मार्चच्या रात्री अनिकेत सादुडे या मुलाचे अपहरण करण्यात आले. अनिकेतच्या अपहरणानंतर त्याच्या घरासमोर पाच पाणी पत्र ठेवण्यात आले. यातून 60 लाख रुपयांची मागणी करण्यात आली. या प्रकरणाचा तपास वाशिम पोलिसांकडून सुरू होता. पोलिसांकडून विविध पथके घटनेचा तपास करत होती. मात्र या घटनेसंदर्भात कुठलाही सुगावा पोलिसांना लागला नाही. आज अखेर नवव्या दिवशी वाशिम- पुसद रोडवरील अनसिंग जवळ अनिकेतचा मृत्यूदेह आढळला असून या संदर्भात पुढील तपास वाशिम पोलीस करत आहेत.