गेल्या काही वर्षांपासून भारतातील विविध राज्यात सतत बलात्काराच्या घटना घडत आहेत. हळू हळू अशा काही घटना महाराष्ट्र राज्यात देखील घडू लागल्या. मात्र, काय होईल जर तुम्हाला कळेल की आपल्याच नराधम बापाने आपल्याच पोटच्या मुलीवर बलात्कार केला तर? चला जाणून घेऊया.
बुलढाणा जिल्ह्यात नराधम बापाने आपल्याच पोटच्या मुलीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे, अनेकजण तीव्र संताप व्यक्त करत आहेत.
दीड वर्षांपूर्वीच...
दीड वर्षांपूर्वी बुलढाणा जिल्ह्यातील जलंब पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या एका गावात अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्यामुळे तिथल्या पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपी विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दीड वर्षानंतर डीएनएच्या रिपोर्टमुळे प्रकरण उघडकीस:
अज्ञात आरोपी विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांच्या हाती एक मोठी अपडेट आली. डीएनए रिपोर्टनुसार हे स्पष्ट झाले की, या अल्पवयीन मुलीला 28 आठवड्यांची गर्भवती करणारा दुसरा तिसरा कोणीही नसून तिच्याच नराधम बापाने केला आहे. त्यामुळे जलंब पोलीस ॲक्शन मोड मध्ये येऊन नराधम बापाला अटक केले. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या धक्कादायक प्रकारामुळे अनेकजण तीव्र संताप व्यक्त करत आहेत.
सामूहिक बलात्काराच्या वाढत्या घटना:
16 दिसेंबर 2012 रोजी दिल्लीमध्ये झालेल्या सामूहिक बलात्कारामुळे संपूर्ण जग हादरला होता. या घटनेनंतर देशातील विविध राज्यात बलात्काराच्या घटना घडू लागल्या. अशातच, 28 नोव्हेंबर 2019 रोजी हैदराबादच्या शमशाबादमध्ये 26 वर्षीय पशुवैद्य असलेल्या महिला डॉक्टरवर सामूहिक बलात्काराचे प्रकरण घडले. या घटनेवर संपूर्ण भारतातील जनतेने तीव्र संताप व्यक्त केला होता. मात्र, या घटनेच्या काही दिवसांनीच संशयितांना ताब्यात घेण्यात आले होते. परंतु, ही घटना एवढ्यावरच थांबली नाही. 2024 मध्ये कोलकातामधील एका नराधमाने महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केली.
देशासोबतच, महाराष्ट्रातही घडू लागल्या बलात्काराच्या घटना:
नुकताच, महाराष्ट्राच्या बदलापूरमधील एका नामांकित शाळेत शिशुवर्गात शिकणाऱ्या दोन चिमुरड्या मुलींवर अक्षय शिंदे नावाच्या नराधमाने अत्याचार केला होता. त्यानंतर महाराष्ट्रातील अनेक राज्यात बलात्काराच्या घटना घडू लागल्या.