पुणे : महायुती सरकारने लाडकी बहीण योजना आणली. या योजनेमुळे लाडक्या बहिणींना अर्थिक मदत झाली आहे. मात्र बऱ्याच दिवसांपासून लाडकी बहीण योजनेविषयी चर्चा आहेत. अपात्र लाडक्या बहिणींचे अर्ज रद्द केले जाणार आहेत अशा चर्चा आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
लाडकी बहीण योजनेच्या निकषात ज्या महिला बसत नाहीत. त्या महिलांनीही या योजनेचा लाभ घेतला आहे. त्यामुळे निकषात बसत नसेल तर त्या लाडक्या बहिणींचे अर्ज अपात्र केले जाणार आहेत. या अनुषंगाने सरकारने पाऊले उचलली आहेत. लाडकी बहीण योजनेसाठी घरोघरी जाऊन पडताळणी केली जाणार आहे. त्यासाठी आजपासून अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिका पाहणी करणार आहेत. कुटुंबात चारचाकी वाहन असेल तर लाडक्या बहिणीचे योजनेतून नाव वगळण्यात येणार आहे.
हेही वाचा : धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढणार; अंजली दमानिया पत्रकार परिषदेत संतोष देशमुख हत्या प्रकरणी करणार मोठा गौप्यस्फोट
महिला बाल विकास विभागाने प्रादेशिक परिवहन विभागाकडून डाटा मागवून घेतला आहे. पुणे जिल्ह्यातून केवळ पाच लाडक्या बहिणीने योजनेतून माघार घेतली आहे. योजनेच्या निकषात बसत नसेल तर माघार घेण्याचं आवाहन महिला व बालविकास विभागाकडून करण्यात आलं आहे.
हेही वाचा : नाशिक पालकमंत्री पदाचा निर्णय मुख्यमंत्री घेणार - नीलम गोऱ्हे
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महायुती सरकारने जुलै महिन्यात सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा १५०० रूपये दिले जातात. या योजनेमुळे महिलावर्ग महायुती सरकारवर खुश आहे. निवडणुकीच्याआधी सरकारने अर्ज केलेल्या सरसकट महिलांना या योजनेचा लाभ दिला. परंतु सरकार आता लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची छाननी करणार आहे. ज्या महिला निकषात बसत नसतील. त्या लाडक्या बहिणींचे अर्जांची छाननी केली जाणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींची चिंता वाढली आहे.