मुंबई : आमदार चित्रा वाघ यांनी उद्धव सेनेच्या खासदाराचा शायना एन सी यांच्याबद्दल केलेल्या विकृत वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. त्यांनी म्हटले की, “उद्धव आणि त्यांच्या चेल्यांची गलिच्छ संस्कृती यालाच विकृती म्हणतात. शिवसेना आणि महायुतीच्या उमेदवारावर केलेले उद्गार निंदनीय आणि संतापजनक आहेत.” वाघ यांनी संजय राऊत यांचेही लक्ष वेधले, ज्यांनी महिलांना खालच्या पातळीच्या शिव्या दिल्या. "या विकृत उद्धव सेनेकडे साधी दिलगिरी व्यक्त करण्याची दानत सुद्धा नाही," असे ते म्हणाल्या.
चित्रा वाघ यांचा आरोप आहे की, बाळासाहेबांची शिवसेना आणि त्यांचे तत्व सोडून उद्धव सेनेने आता खालच्या पातळीवर बोलणे सुरू केले आहे. त्यांचे विविध टोमणे आणि शारीरिक व्यंगावर बोलणे हे त्यांच्या फावल्या वेळाचे धंदे बनले आहेत. तसेच, त्यांनी मराठा समाजाच्या शांततेने निघालेल्या लाखोंच्या मूक मोर्चाला "मुका मोर्चा" म्हणून अपमानित केले होते.
वाघ यांनी मातोश्रीच्या उकीरड्यावर आणखी काय सापडणार याबाबत प्रश्न उपस्थित केला, तसेच सुज्ञ आणि सुशिक्षित विकासाची, हिंदुत्वाची काळजी करणाऱ्या मतदारांनी या घाणेरड्या उकिरड्यावर त्यांच्या दफनाची खात्री नक्कीच मतदार करतील असेही वाघ यांनी म्हटले आहे.