Friday, March 21, 2025 10:37:30 AM

तणावमुक्त राहा आणि सकारात्मक विचार ठेवून परीक्षा द्या; मुख्यमंत्र्यांचा विद्यार्थ्यांना सल्ला

तणावमुक्त राहा आणि सकारात्मक विचार ठेवून परीक्षा द्या, असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात दहावी बारावीच्या विद्यार्थांना दिला.

तणावमुक्त राहा आणि सकारात्मक विचार ठेवून परीक्षा द्या मुख्यमंत्र्यांचा  विद्यार्थ्यांना सल्ला
CM Devendra Fadnavis
Edited Image

CM Devendra Fadnavis On Pariksha Pe Charcha: तणावमुक्त राहा आणि सकारात्मक विचार ठेवून परीक्षा द्या, असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात दहावी बारावीच्या विद्यार्थांना दिला असून त्यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यासह देशभरातील दहावी बारावी विद्यार्थ्यांच्या परीक्षा येत्या 15 फेब्रुवारी रोजी सुरू होत असून 18 मार्च 2025 पर्यंत ही परीक्षा असणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी परीक्षा पे चर्चा या उपक्रमातून देशभरातील विद्यार्थ्यांना तणावमुक्त परीक्षा देण्याचे आवाहन करत आहेत. 

सामान्य माणूस कष्ट करून असामान्य होतो - मुख्यमंत्री

याच कार्यक्रमाच्या धर्तीवर मुंबईमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी ते म्हणाले की, जी माणसं असामान्य दिसतात ते सामान्यच असतात. परंतु, सामान्य माणूस काम करत करत कष्ट करतो. त्यावेळेला तो असामान्य होतो.
प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये असामान्य व्यक्ती होण्याची क्षमता असते. 

हेही वाचा - रामराजे नाईक निंबाळकरांचं मोबाईल स्टेटस चर्चेचा विषय

मेहनत, चिकाटी आणि सातत्य असेल तर हमखास यश - देवेंद्र फडणवीस 

पुढे विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, प्रत्येकजण जीवनामध्ये जे जे स्वप्न बघितले आहे ते पूर्ण करण्यासाठी धडपडत असतो. प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील दहावी बारावी महत्त्वाचा टप्पा असतो. पुढील शिक्षणासाठी नेमके कोणत्या क्षेत्रात आपले भविष्य अजमावायाचे आहे, यासाठी या परीक्षांचे अनन्यसाधारण महत्त्व असते. खरंतर जीवनातील हा महत्त्वाचा टप्पा पार करताना अभ्यासामध्ये मेहनत, चिकाटी आणि सातत्य असेल तर हमखास यश मिळू शकते. 

हेही वाचा - मनसेचा कोणता नेता जाणार भाजपा विधान परिषदेवर?

या सर्वातूचं आपल्या जीवनाची सुखकर वाटचाल होते, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केले. आपल्या मनातील भीतीवर विजय मिळवणे ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. हा विजय आपण मिळवू शकलो तर जीवनात कुठल्याच गोष्टी आपल्याला विचलित करू शकत नाही, असंही यावेळी मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. 


सम्बन्धित सामग्री