भारतामध्ये कापूस (cotton) अत्यंत महत्वाचा आहे. कापूस (cotton) फक्त शेतीवर आधारित अर्थव्यवस्थेचा एक मोठा भागच नाही, तर कापूस (cotton) वस्त्र उद्योगासाठी कच्चा माल पुरवतो. कापसाच्या (cotton) उत्पादनामुळे शेतकऱ्यांना आणि त्यासोबत वस्त्र उद्योगालादेखील मोठ्या प्रमाणात मदत होते. त्यासोबतच, कापसाच्या (cotton) निर्यातीतून महाराष्ट्रासोबतच, भारताच्या अर्थव्यवस्थेलादेखील मोठ्या प्रमाणात चालना मिळते. राज्यात कापसाच्या (cotton) नवीन हंगामातील मालाची आवक सुरू झाली आहे. मात्र, शेतकऱ्यांना अपेक्षित भाव नसल्यामुळे शेतकरी आपला माल बाजारात आणण्यास टाळत आहेत.
कापसाच्या दरात घसरण:
कापसाचे दर बाजारातील स्थितीनुसार बदलतात, त्यामुळे शेतकऱ्यांवर आणि उद्योगांवर त्याचा परिणाम होतो. देशात सुमारे 130 लाख हेक्टरवर कापसाची लागवड होते. मात्र, काही वर्षांपासून कापसाच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. यावर्षीचा विचार केला तर भाव वाढीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी आधीपासूनच कापूस साठवणुकीवर भर दिला. त्यामुळे बाजारपेठेत कापूस विक्रीसाठी ज्या प्रमाणात कापूस अपेक्षित होते, तेवढ्या प्रमाणात कापूस उपलब्ध नसल्यामुळे पुरवठा अत्यल्प होत आहे. अशातच, पावसाचा फटका बसल्यामुळे उर्वरीत कापूस शेतकऱ्यांनी हजारो रूपये खर्चुन वेचून घेतले आहे.
कापसाला चांगले दर मिळेल या आशेने 80 ते 85 टक्के कापूस शेतकऱ्यांच्या घरात:
कापसाला चांगला भाव मिळेल, या आशेवर अनेक शेतकरी होते. मात्र, दिवसेंदिवस कापसाचे भाव कोसळत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. अपेक्षित भाव नसल्यामुळे शेतकरी आपला माल बाजारात आणणे टाळत आहेत. सध्या कापसाला 7200 रुपये प्रति क्विंटल दर आहे. मागच्या वर्षीचा विचार केला तर कापसाला कधी नव्हे एवढे जास्त दर मिळाले होते. त्यामुळे, यावर्षीदेखील शेतकरी बंधुंनी कापसाला जास्त दर मिळेल या विचारानेच कापसाची शेती केली आणि कापूस विक्रीसाठी कापसाला बाहेर न काढल्यामुळे जवळजवळ 80 ते 85 टक्के कापूस अजून देखील शेतकऱ्यांच्या घरातच आहे.
'शासनाने दहा हजार रुपये प्रति क्विंटल कापसाला दर द्यावे', अशी अपेक्षा यावेळी कापूस शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.