Monday, February 10, 2025 07:39:29 PM

Pravin Darekar
नाव न घेता दरेकरांचा गोगावलेंना टोला

महायुतीचे सरकारमध्ये आता पालकमंत्रिपदांची घोषणा झाली आहे.

नाव न घेता दरेकरांचा गोगावलेंना टोला

रायगड : महायुतीचे सरकारमध्ये आता पालकमंत्रिपदांची घोषणा झाली आहे. मात्र यावर काही मंत्री नाराज असल्याची चर्चा आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षामध्ये पालकमंत्रिपदावरून नाराजीचा सूर दिसत आहे. यावर पालकमंत्रिपदासाठी रस्त्यावर वाद विवाद होणं महायुतीला शोभा देणारं नसल्याचे भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे. 

हेही वाचा : मुंबईत ग्रंथोत्सवाचे आयोजन; कोणत्या दिवशी होणार ग्रंथोत्सव?

भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी पालकमंत्रिपदाच्या नाराजीवर भाष्य केले आहे. रायगडच्या पालकमंत्रिपदावरून रस्त्यावर उतरुन वादविवाद करणं अशोभनीय आहे अशा कानपिचक्या दरेकर यांनी दिल्या. पालकमंत्रिपद म्हणजे जीवन- मरणाचा प्रश्न नाही असेही दरेकर यांनी दोन्ही पक्षांना सुनावलं आहे. 

दरेकर यांनी शिवसेना आणि राष्‍ट्रवादी कॉंग्रेसला कानपिचक्‍या दिल्‍या आहेत. पालकमंत्रिपदासाठी रस्‍त्‍यावर वाद विवाद होणं महायुतीला शोभा देणारं नाही. पालकमंत्रिपद म्‍हणजे आपल्‍या जीवन मरणाचा प्रश्‍न नाही महाराष्‍ट्रातील जनतेला कुणाला काय मिळावं यासाठी नव्‍हे तर महाराष्‍ट्राचा विकास व्‍हावा यासाठी महायुतीला मोठा जनाधार दिलाय, असं दरेकर यांनी सुनावलं आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

महायुती सरकार स्थापन होण्याआधी मुख्यमंत्री कोण होणार यावर चर्चा होताना पाहायला मिळाली. त्यानंतर मंत्रीपदावरून आमदारांमध्ये नाराजीचा सूर बघायला मिळाला आणि आता पालकमंत्रिपदानवरून काही आमदारांमध्ये नाराजी दिसून येत आहे. रायगडचे पालकमंत्रिपद मिळण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना दोन्ही पक्ष आग्रही असल्याचे दिसत आहे. मात्र रायगडचे पालकमंत्रिपद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्री आदिती तटकरे यांना मिळाले. यावरून रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी आग्रही असलेले भरत गोगावले दुखावले असल्याच्या चर्चा पाहायला मिळाल्या. तर दुसरीकडे तानाजी सावंत हे देखील पालकमंत्रिपदावरून नाराज असल्याचे पाहायला मिळाले. नरहरी झिरवाळ देखील हिंगोलीच्या पालकमंत्रिपदावरून नाराज असल्याचे त्यांच्या वक्तव्यातून पाहायला मिळाले आहे. 


सम्बन्धित सामग्री