महाराष्ट्र: गेल्या अनेक महिन्यांपासून मृत सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून राज्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येतंय. या प्रत्येक आंदोलनात देशमुख कुटुंब देखील सहभागी होत असल्याचं पाहायला मिळतंय. त्यातच आज संतोष देशमुखांच्या न्यायासाठी गावकऱ्यांनी एल्गार पुकारलाय. मस्साजोग ग्रामस्थांचं आजपासून अन्नत्याग आंदोलन सुरूय. न्याय मिळेपर्यंत शांत बसणार नाही असं मृत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी म्हटलंय. या मस्साजोग ग्रामस्थांच्या अन्नत्याग आंदोलनाला वारकरी संप्रदायाचा पाठिंबा असल्याचं देखील पाहायला मिळतंय. त्यातच आता धनंजय देशमुख आणि ग्रामस्थांच्या या उपोषणामुळे राज्यसरकारवर मुंडेंच्या राजीनाम्याचा दबाव वाढणार का? असा प्रश्न निर्माण झालाय. त्यामुळे धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ झाली असून त्याच मंत्रिपद धोक्यात आहे की काय? असा प्रश्न निर्माण झालाय.
हेही वाचा: Mahashivratri 2025: महाशिवरात्रीला बनवा बटाट्यापासून चटपटीत पदार्थ
काय आहेत आंदोलकांच्या मागण्या?
1)केजचे तत्कालीन PI प्रशांत महाजन व PSI राजेश पाटील यांना बडतर्फ करुन सहआरोपी करा.
2)फरार आरोपी कृष्णा आंधळेला अटक करा
3)सरकारी वकील म्हणून उज्जवल निकम यांची नियुक्ती करावी.
4)सदरील प्रकरण जलदगती न्यायालयात चालवणे.
5)वाशी पोलीस स्टेशनचे PSI घुले, पो.कॉ. दिलीप गित्ते, गोरख व दत्ता बिक्कड, हेड कॉ. यांचे CDR तपासून यांना सहआरोपी करा.
6)आरोपींना फरार करण्यास मदत करणारे संभाजी वायबसे दांपत्य, बालाजी तांदळे, संजय केदार, सारंग आंधळे यांची चौकशी करुन यांना तात्काळ सहआरोपी करावे.
7)घटना घडल्यानंतर संतोष देशमुख यांचा मृतदेह केज रुग्णाण्यात नेण्याऐवजी PSI राजेश पाटील यांनी कळंबकडे कोणाच्या सांगण्यावरून वळवला याची चौकशी करण्यात यावी.
काय म्हणाले धनंजय देशमुख?
आम्ही न्यायच्या भूमिकेत आहोत, पोलीस अधीक्षकांची भेट झाली होती. त्यांनी विनंती केली होती, उपोषण थांबवण्याची परंतु गावकऱ्यांनी हा निर्णय घेतलेला आहे, जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही,आमच्या ज्या मागण्या आहेत त्या सरकारने तातडीने पूर्ण कराव्यात, अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली.
दरम्यान या मस्साजोग ग्रामस्थांच्या अन्नत्याग आंदोलनाला वारकरी संप्रदायाचा पाठिंबा असल्याचं देखील पाहायला मिळतंय. त्यातच आता धनंजय देशमुख आणि ग्रामस्थांच्या या उपोषणामुळे राज्यसरकारवर मुंडेंच्या राजीनाम्याचा दबाव वाढणार का? असा प्रश्न निर्माण झालाय. त्यामुळे धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ झाली असून त्याच मंत्रिपद धोक्यात आहे की काय? असा प्रश्न निर्माण झालाय.