२ सप्टेंबर, २०२४, मुंबई : लहानमोठ्यांचा आवडता सण म्हणजे गणेशोत्सव. शहर असो वा गाव सर्वत्र गौरी - गणपती सण मोठ्या उत्साहात साजरा होतो. यंदा ७ सप्टेंबर रोजी बाप्पाचे आगमन होत आहे. गणपती पाठोपाठ गौरीचेही माहेरी आगमन होते. भाद्रपद महिन्यातील अनुराधा नक्षत्रावर गैरीचे आवाहन, ज्येष्ठा नक्षत्रावर गौरी पूजन आणि मूळ नक्षत्रावर गौरी विसर्जन करण्यात येते. यंदा १० सप्टेंबरला गौरी आगमन होणार आहे. गौरी किंवा गौराई म्हणजे प्रत्यक्ष पार्वती... या माहेरवाशिणीचे लाड करायला या दिवशी काही ठिकाणी गोडाचा तर काही ठिकाणी तिखटाचा नैवेद्य केला जातो. झिम्मा - फुगड्या घालत, अंगणात फेर धरत रात्र जागवली जाते. याच गौरीच्या जागरणाची गाणी खास वाचकांसाठी...
१) गणपती राया पड़ते मी पाया
गणपती राया पड़ते मी पाया
काय मागु मागनं रे
तुझा दयेचा तुझा कृपेचा
आशिर्वाद राहु दे रे
हेच माझ सांगन रे देवा - २
२) ऐलमा पैलमा गणेश देवा
ऐलमा पैलमा गणेश देवा
माझा खेळ मांडू दे, करीन तुझी सेवा - २
करीन तुझी सेवा, मला हवा भरतार
चंद्रमोळी झोपडीत माझा संसार
ऐलमा पैलमा गणेश देवा
माझा खेळ मांडू दे, करीन तुझी सेवा
माझा खेळ मांडीला वेशीच्या दारी
पारवं घुमतंय पारावरी
३) कारल्याचं बी लाव गं सुने
कारल्याचं बी लाव गं सुने लाव ग सुने...
मग जा आपल्या माहेरा गं माहेरा
कारल्याची बी लावली हो सासूबाई लावली हो सासूबाई
आता तरी जाऊ का माहेरा ओ माहेरा
कारल्याला पाणी घाल गं सुने लाव गं सुने...
मग जा आपल्या माहेरा गं माहेरा
कारल्याला पाणी घातलं ओ सासूबाई घातलं ओ सासूबाई
आता तरी जाऊ का माहेरा ओ माहेरा
कारल्याला वेल येऊ दे गं सुने येऊ दे गं सुने...
मग जा आपल्या माहेरा गं माहेरा
कारल्याला वेल आला ओ सासूबाई आला ओ सासूबाई
आता तरी जाऊ का माहेरा ओ माहेरा
कारल्याला कारलं येऊ दे गं सुने येऊ दे गं सुने...
मग जा आपल्या माहेरा गं माहेरा
कारल्याला कारलं आलं ओ सासूबाई आलं ओ सासूबाई
आता तरी जाऊ का माहेरा ओ माहेरा
कारल्याची भाजी कर गं सुने येऊ दे गं सुने...
मग जा आपल्या माहेरा गं माहेरा...
४) राधा रुसली सुंदर
राधा रुसली सुंदर
समजावितो हरी
नि राधे चल ग मंदिरी - २
नथ ठेवली तबकात
कृष्ण लावितो हाथ
नि माझ्या गळ्याची शप्पथ...
राधा रुसली सुंदर
समजावितो हरी
नि राधे चल ग मंदिरी - २
पैंजण ठेविले तबकात
कृष्ण लावितो हाथ
नि राधे घाल गं पायात...
राधा रुसली सुंदर
समजावितो हरी
नि राधे चल ग मंदिरी - २
फुलं ठेविले तबकात
कृष्ण लावितो हाथ
नि राधे माळ गं केसात...
राधा रुसली सुंदर
समजावितो हरी
नि राधे चल ग मंदिरी - २
५) दिंड्या मोड़ गं पोरी
दिंड्या मोड़ गं पोरी। दिंड्याची लांब दोरी। - २
मका खुड गं पोरी । मक्याला पीक भारी । - २
दिंड्याखाली कोण गं उभी ?
ताय भावोजी मी हाय उभी...
हातातल्या बांगड्या काय गं केल्यास ?
आली होती तोडेवाली तिला मी दिल्या ।
कुण्या वाटेनं गेली ? सांग दादा... -२
कुण्या पेठेनं गेली सांग दादा... - २
गोरी गोमटी होती सांग दादा... - २
चण फुटानं होती सांग दादा... - २
दिंड्या मोड़ गं पोरी। दिंड्याची लांब दोरी। - २
मका खुड गं पोरी । मक्याला पीक भारी । - २
दिंड्याखाली कोण गं उभी ?
ताय भावोजी मी हाय उभी...
नाकातली नथ काय गं केलीस ?
आली होती माळीण तिला मी दिली ।
कुण्या वाटेनं गेली ? सांग दादा... -२
कुण्या पेठेनं गेली सांग दादा... - २
गोरी गोमटी होती सांग दादा... - २
चण फुटानं होती सांग दादा... - २