बीड : बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरण ताजे असताना भाजपा आमदार सुरेश धस यांनी महादेव मुंडे हत्या प्रकरण समोर आणले आहे. महादेव मुंडे यांची 22 ऑक्टोबर 2023 रोजी हत्या झाली होती. त्यांची परळी वैजनाथच्या तहसील कार्यालयासमोर हत्या करण्यात आली होती. महादेव मुंडे मूळचे कान्हेर वाडीचे होते. या प्रकरणात आमदार धस यांनी आणखी खुलासे केले आहेत.
विशेष म्हणजे या प्रकरणातील आरोपी अद्यापही फरार आहेत.
महादेव मुंडे यांची परळीतील तहसील कार्यालयासमोर हत्या करण्यात आली. या प्रकरणी धस यांनी अनेक गौप्यस्फोट केले आहेत. महादेव मुंडेचा मारेकरी अद्याप मोकाट आहे. तसेच तपास आकाच्या मुलाभोवती फिरतोय असा खळबळजनक दावा भाजपा आमदार सुरेश धस यांनी केला आहे.
हेही वाचा : भाव 2025- कला आणि संस्कृतीचा महाकुंभ
महादेव मुंडे या व्यक्तीचा 22 ऑक्टोबर 2023 रोजी खून करण्यात आला. तहसीलदार कार्यालयासमोर हा प्रकार घडला. या प्रकरणाचा तपास पीआय सानप यांच्याकडे होता. त्यांनी या प्रकरणाचा छडा लावला. परंतु आकाने आरोपीला अटक करायचे नाही असे सांगितले आणि दुसरेच आरोपी पकडले. यामुळे हत्येचा तपास लागला नाही. सानप प्रामाणिक पोलिस अधिकारी होते. त्यांनी तपास केला. परंतु तपास आकाचे चिरंजीव (सुनील कराड) याच्याभोवती फिरत असल्याने सानप यांच्यावर दबाव आणला गेला. आता त्यांची बदली झाली आहे.
महादेव मुंडे कोण?
महादेव मुंडे हे परळी येथील व्यावसायिक होते. त्यांचे मूळगाव परळी तालुक्यातील भोपला आहे. 22 ऑक्टोबर 2023 रोजी परळीतील तहसील कार्यालयाच्या समोरील आवारात त्यांचा मृतदेह सापडला होता. धारदार शस्त्राने त्यांच्यावर वार करण्यात आल्याचे तपासात समोर आले.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
'महादेव मुंडे प्रकरणात राजकारणाचा विषय नाही'
याप्रकरणात महादेव मुंडेंचे मेव्हणे सतीश फड यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. 21 ऑक्टोबर 2023 ला खून झाला. आम्ही अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला. मुंडे हत्या प्रकरणाचा पाठपुरावा आम्ही केला. तेव्हा सानप हे पीआय होते. त्यावेळी एसपी ठाकुर यांना निवेदन दिले होते. एलसीबीला गुन्हा वर्ग करा अशी मागणी केली पण तो झाला नाही असे सतीश फड यांनी सांगितले. बारगळ यांना भेटलो पण ते म्हणाले तपास करत आहोत. मी औरंगाबादला न्यायालयात याचिका दाखल केली. नवीन एसपी साहेबांना भेटलो. 27 डिसेंबर 2024 रोजी पोलिस अधिक्षक म्हणाले मी पाठपुरावा करतो. ते परळीला आले असता माझे वडील त्यांना भेटले.मी सुद्धा आता पाठपुरावा करत आहे.आताच्या अधिकाऱ्यांनाही भेटलो ते म्हणाले तपास सुरु आहे. तसेच हे प्रकरण धस यांनी समोर आणल्याने त्यांचे आभार फड यांनी मानले आहेत. धस यांनी महादेव मुंडे प्रकरण समोर आणले. यामध्ये राजकारणाचा विषय नसल्याचेही फड यांनी म्हटले आहे.