जालना : जालना जिलह्यात आंतरजातीय विवाह केल्यानं मुलीला नातवासह डांबून ठेवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आई-वडिलांनीच मुलीला साखळदंडानं बांधून ठेवलं. या घटनेमुळे जालन्याच्या भोकरदनमध्ये खळबळ उडाली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
जालन्यात मुलीने आंतरजातीय विवाह केल्याने आई-वडिलांनीच मुलगी साखळदंडानं बांधून ठेवलं. तब्बल दोन महिने घरात डांबून ठेवल्याची माहिती आहे. विवाहितेच्या पतीने न्यायालयात मागितली. त्यानंतर भोकरदन पोलिसांनी मुलीची सुटका करून पतीच्या ताब्यात दिलं.
हेही वाचा : नवजात बाळाच्या पोटातून 2 मृत अर्भक काढले; पुढे काय झालं?
जालन्याच्या भोकरदनमधील खळबळजनक घटना
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भोकरदन शहरापासून जवळच असलेल्या अलापूर गावांमध्ये एका मुलीने आंतरजातीय विवाह केला. विवाहानंतर बऱ्याच वर्षांनी ती मुलगी माहेरी आली. आंतरजातीय विवाह केला म्हणून विवाहित महिलेच्या आई-वडिल आणि भावांनी तिला व तिच्या पाच वर्षाच्या चिमुकल्या मुलाला साखर दंडाने बांधून ठेवले होते. दोन महिने झाले तरी ती महिला सापडत नसल्यामुळे तिच्या पतीने अखेर छत्रपती संभाजीनगर येथील न्यायालयात दाद मागितली. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशावरून सोमवारी 3 फेब्रुवारी रोजी पोलिसांनी सदर महिलेची सुटका केली. या महिलेसह तिच्या पाच वर्षाच्या मुलाला चक्क आई-वडिलांनीच साखळदंडाने बांधले होते.दोन महिन्यापासून त्यांना घरात कोंडून ठेवले होते. यावेळी पोलिसांनी मोठ्या संघर्षाने या महिलेला सुखरूप बाळासह बाहेर काढली व न्यायालयासमोर हजर केले. त्यानंतर विवाहितेला पतीच्या ताब्यात दिले अशी माहिती पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी दिली आहे.
हेही वाचा : Ladki Bahin: 'या' लाडक्या बहिणीचे अर्ज योजनेतून नाव वगळण्यात येणार