Sunday, February 09, 2025 04:02:59 PM

E-Bus Factory Soon in Nagpur Nitin Gadkari Says
Nitin Gadakari: नागपुरात लवकरच ई-बसची फॅक्टरी

नागपूरमध्ये लवकरच इलेक्ट्रिक बस निर्मितीसाठी मोठी फॅक्टरी येणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागरिकांना ही गुड न्यूज दिली आहे.

nitin gadakari नागपुरात लवकरच ई-बसची फॅक्टरी

नागपूर: नागपूरमध्ये लवकरच इलेक्ट्रिक बस निर्मितीसाठी मोठी फॅक्टरी उभी राहणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरकरांना हीआनंदाची बातमी दिली आहे. पर्यावरणपूरक वाहतुकीस चालना देणाऱ्या या प्रकल्पामुळे नागपूरचे महत्त्व वाढणार असून, शहरात रोजगाराच्या संधीही उपलब्ध होणार आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लवकरच स्वित्झर्लंडमधील दावोस येथे होणाऱ्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या परिषदेत सहभागी होणार आहेत. या दौऱ्यात ते महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक आणण्यासाठी विविध करार करणार असल्याची माहिती मिळाली आहे. यामध्ये नागपूरमधील ई-बस फॅक्टरीसाठी करार करण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

या प्रकल्पामुळे नागपुरात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होईल, असे गडकरी यांनी सांगितले. शिवाय, पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे प्रदूषण नियंत्रणात ठेवण्यास मदत होणार आहे. नागपूर हे स्मार्ट सिटी म्हणून विकसित होत असताना हा प्रकल्प शहराच्या विकासासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरेल.
नागपूरमध्ये ई-बसची फॅक्टरी सुरू होण्याच्या बातमीने नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. 

👉👉 जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

 

 

 

 


सम्बन्धित सामग्री