Friday, March 21, 2025 09:46:20 AM

हत्तीवरुन मिरवणूक काढणं भोवलं; संयोजक आणि देवस्थानच्या अध्यक्षांवर गुन्हा दाखल

पुणे जिल्ह्यातील मुळशीमध्ये हत्तीवरुन मिरवणूक काढणं भोवलं आहे.

हत्तीवरुन मिरवणूक काढणं भोवलं संयोजक आणि देवस्थानच्या अध्यक्षांवर गुन्हा दाखल

पुणे : पुणे जिल्ह्यातील मुळशीमध्ये हत्तीवरुन मिरवणूक काढणं भोवलं आहे. त्यामुळे संयोजक आणि देवस्थानच्या अध्यक्षांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   वन्यजीव संरक्षण कायद्याचं उल्लंघन केल्यानं हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

पुण्यातील मुळशीमध्ये हत्तीवरुन मिरवणूक काढणं चांगलच भोवलं आहे.  राष्ट्रवादीचे आमदार शंकर मांडेकर यांची हत्तीवरुन मिरवणूक काढली. यामुळे वन अधिकऱ्यांनी कारवाई केली आहे. संयोजक आणि देवस्थानच्या अध्यक्षांवर गुन्हा दाखल करण्यात आला. वन्यजीव संरक्षण कायद्याचं उल्लंघन केल्याने गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हत्तीवरुन मिरवणूक काढल्याचा व्हिडीओ समाज माध्यमांमध्ये व्हायरल झालाय हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने वन्य अधिकाऱ्यांनी कारवाई केली आहे. मिरवणुकीसाठी हत्ती देणाऱ्या सांगलीतील देवस्थानच्या अध्यक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : कराड-मुंडेंच्या बातम्या बघितल्यानं तरुणावर हल्ला; आरोपींच्या मोबाईलवर कृष्णा आंधळेचे स्टेस्ट्स

 

मुळशीत आमदार मांडेकर यांची हत्तीवरून मिरवणूक

पुण्याच्या मुळशीमधील उरवडे गावात राष्ट्रवादीचे आमदार शंकर मांडेकर यांची हत्तीवरून काढण्यात आलेली मिरवणूक कार्यकर्त्यांना भोवली. वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी वन विभागाने मांडेकर यांच्या मिरवणुकीचे संयोजक आणि हत्ती देणाऱ्या सांगलीतील गणपती पंचायतन देवस्थानच्या अध्यक्षांवर गुन्हा दाखल केला. मांडेकर यांची भोर विधानसभा मतदारसंघातून आमदार पदी निवड झाल्याबद्दल उरवडे गावाच्या ग्रामस्थांकडून त्यांची फुलांची उधळण करत हत्तीवरून जंगी मिरवणूक काढली. यावेळी 125 किलो पेढ्यांचं वाटप करत भव्य नागरी सत्कार करण्यात आलं. मात्र याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर वायरल झाल्यानंतर पुणे जिल्ह्याचे मानद वन्यजीवरक्षक आदित्य परांजपे यांनी याबाबत अधिक माहिती घेतली. तेव्हा वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन झाल्याचं निदर्शनास आले. त्यानंतर सर्व नियम धाब्यावर बसवून हत्तीवरून मिरवणूक काढल्याबद्दल संयोजक आणि संबंधित संस्थेवर वन अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा : ज्येष्ठ क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरींचं निधन

 


सम्बन्धित सामग्री