छत्रपती संभाजीनगर : पावसाळ्याचे दोन महिने संपत आले तरीसुद्धा मराठवाड्यात म्हणावा तसा पाऊस झाला नाही. त्यामुळे अनेक छोटे मोठे प्रकल्प अजूनही तळालाच आहेत. जुलै महिना अर्धा उलटूनही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दमदार पाऊस झालेला नसल्याने जिल्ह्यातील अनेक गावांना टँकरच्या पाण्यावरच अवलंबून रहावे लागत आहे. जिल्ह्यातील २७९ गावांची तहान ४०७ टँकरने भागविली जात आहे. गंगापुर तालुक्यात सर्वाधिक ११० टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तर सिल्लोड तालुक्यात सर्वात कमी ४० टँकरने सध्या पाणीपुरवठा सुरु आहे.