मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या कामाच्या बाबतीत 'फायर' आहेत, हे त्यांनी दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत दाखवून दिलंय. महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी तब्बल 16 लाख कोटी रूपयांची गुंतवणूक आणली आहे. मात्र, तेवढ्यावर फडणवीस शांत राहिले नाहीत तर त्यांनी तिथे उपस्थित असलेल्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे अधिकारी, मालकांसोबत बैठका करून महाराष्ट्रात म्हणजे पर्यायाने भारतात गुंतवणुकीसाठी त्यांना आमंत्रित केलंय.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
फडणवीस यांनी दावोसमध्ये उपस्थित असलेल्या सर्व गुंतवणूकदारांशी चर्चा करून राज्याला आणि देशासाठी जे जे हितवर्धक आहे, त्यांना आपल्याकडे येण्यासाठी आमंत्रित केलंय. काल्सबर्ग समूहाचे सीईओ जेकब अरुप अँडरसन, लुलू समूहाचे मुख्य संचालक एमए युसुफ अली, APAC, Mastercard चे प्रेसिडेंट लिंग हाय यांची भेट घेवून महाराष्ट्रात गुंतवणुकीसंदर्भात त्यांनी चर्चा केली. फिनलंडचे वाणिज्यमंत्री विले ताविओ यांची भेट घेवून महाराष्ट्र-फिनलंडमधील व्यापारी संबंधांबाबत चर्चा केली. फिनलंडमध्ये ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र रोडशो’चे आयोजन करण्याबाबत यावेळी सकारात्मक चर्चा झाली. हरित ऊर्जा, ग्रीन हायड्रोजन, रसायने, खते या क्षेत्रातील गुंतवणुकीबाबतच्या चर्चा यावेळी झाल्या. ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांचीही भेट घेऊन देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्याशी चर्चा केली. एकूणच राज्य आणि देशाच्या आर्थिक विकासाबरोबरच येथे रोजगारांच्या अधिकाधिक संधी उपलब्ध व्हाव्यात, शहरांप्रमाणेच ग्रामीण भागातील जीवनमान उंचावण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस नेहमीच प्रयत्नशील असतात. दावोसमध्ये त्यांना मिळालेली संधी त्यांनी हेरली आणि ते करून दाखवलंही.
हेही वाचा : दावोसमध्ये झालेल्या सामंजस्य करारातून 15.95 लाख रोजगारनिर्मिती होणार