मुंबई : उद्धव ठाकरे आणि भाजपाचे संबंध गेल्या काही वर्षात कमालीचे ताणले गेले आहेत. त्यावर ठाकरे गट आणि भाजपा एकत्र येतील अशी शक्यता आता कमीच आहे. पण राजकारणात कोणतीही गोष्ट अशक्य नाही याचा प्रत्यय महाराष्ट्राने सत्तांतराच्या आणि आघाड्या महायुतीच्या राजकारणांनी अनुभवला आहे. उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांच्यात अलिकडेच झालेल्या भेटीनंतर दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र येतील असा अंदाज काही राडकीय विश्लेषकांनी वर्तवला होता. भाजपाकडून ठाकरे गटाचे स्वागत होईल अशीही शक्यता पाटील यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर दोघांमधील समेटाच्या चर्चां सुरू झाल्या. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट उत्तर देत दोन पक्ष एकत्र येण्याची शक्यता फेटाळून लावली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
पाटील आणि ठाकरे यांच्यातील संवाद काय?
चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे यांची एका विवाह सोहळ्यात भेट झाली. भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांचे हस्तांदोलन झाले. मिलिंद नार्वेकर म्हणाले युती कधी होतेय? त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले तो माझ्यासाठी सगळ्यात सुवर्ण क्षण असेल! यावर उद्धव ठाकरेंनी दोघांनाही विचारले, अरे काय कुजबुजताय?
त्यावर पाटील ठाकरेंना म्हणाले की, मी हे म्हणत होतो, युती होईल माझ्यासाठी सुवर्ण क्षण असेल!
हेही वाचा : खासदार उदयनराजे राहुल सोलापूरकरावर संतापले; काय म्हणाले?
दोघांमधील या संवादावर राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क रंगवले गेले. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टीकरण देत हा विषय केवळ तेवढ्यापुरताच असल्याचे सांगितले.
हेही वाचा : साताऱ्यातील बड्या नेत्याच्या घरी छापेमारी
मुख्यमंत्री ठाकरेंबद्दल काय म्हणाले?
निवडणूक झाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि माझी सार्वजनिक स्थळी भेट झालीय. बाकी अन्य ठिकाणी कधी भेट झाली नाही. आमच्यातील संबंध कधीच असे नव्हते की भेटलो आणि नमस्कार केला नाही. आम्ही भेटतो, दोन चांगल्या गोष्टी बोलतो, तसे संबंध आहेत. साऊथ भारतात जसे नेते 'जान के प्यासे' असतात. तशी परिस्थिती महाराष्ट्रात नाही. त्यामुळे संवाद करायला, बोलायला काही अडचण नाही.
हेही वाचा : सुरेश धसांच्या आष्टीत पंकजा मुंडेंची डायलॉगबाजी
संबंध चांगले असेल म्हणून राजकीयदृष्ट्या एकत्र येण्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी राजकीय फुल्ली मारली आहे. त्यामुळे राजकारणातील शक्यता- अशक्यतेवर विश्लेषकांनी भाष्य केले असले तरी ठाकरे गटासोबत सध्यातरी भाजपा जाणार नसल्याचे स्पष्ट संकेत फडणवीसांनी यानिमित्ताने जाहीररित्या दिलेत.