कल्याण-शिळफाटा रस्त्यावर फेब्रुवारी महिन्यात महत्त्वाचे काम सुरु होणार आहे. रेल्वेच्या दिल्ली ते जेएनपीटी मार्गावर विशेष कामासाठी शिळफाटा रोड पाच दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. या बंदमुळे पलावा जंक्शनकडे येणारी सर्व प्रकारची अवजड वाहतूक 5 ते 10 फेब्रुवारीदरम्यान बंद राहील.
निळजे रेल्वे उड्डाण पुलाच्या कामासाठी रेल्वे मालवाहतूक विभागाने हा निर्णय घेतला आहे. या कामाच्या कारणामुळे शिळफाटा रस्त्यावर वाहनांची वर्दळ नियंत्रित करणे आवश्यक होते. नियमित वाहतूक सुरू ठेवणे शक्य नसल्याने, 5 फेब्रुवारी रोजी रात्री 12 वाजल्यापासून 10 फेब्रुवारी रात्री 12 वाजेपर्यंत या मार्गावर हलकी, जड आणि अवजड वाहने येणार नाहीत.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
रस्त्यावरील कामांमुळे स्थानिक नागरिकांना आणि वाहतूक करणाऱ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना रस्त्यावरील बदलत्या मार्गांची माहिती आणि पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.
Union Budget 2025: महाराष्ट्रातील रेल्वेसाठी 6640 कोटींची तरतूद!