Thursday, July 10, 2025 04:33:49 AM

अजित पवारांना मोठा धक्का! राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार तुकाराम बिडकर यांचा रस्ते अपघातात मृत्यू

आज महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतल्यानंतर तुकाराम बिडकर आपल्या दुचाकीवरून परतत होते. तेवढ्यात एका पिकअपने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात तुकाराम बिडकर गंभीर जखमी झाले.

अजित पवारांना मोठा धक्का राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार तुकाराम बिडकर यांचा रस्ते अपघातात मृत्यू
Tukaram Bidkar Passes Away
Edited Image

Tukaram Bidkar Passes Away: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार आणि विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष तुकाराम बिडकर यांचे रस्ते अपघातात निधन झाले आहे. आज महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतल्यानंतर तुकाराम बिडकर आपल्या दुचाकीवरून परतत होते. तेवढ्यात एका पिकअपने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात तुकाराम बिडकर गंभीर जखमी झाले. 

प्राप्त माहितीनुसार, अकोल्यातील राष्ट्रीय महामार्गावरील शिवनीजवळ हा अपघात झाला. अकोला येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान बिडकर यांचा मृत्यू झाला. तुकाराम बिडकर हे अकोला जिल्ह्यातील अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि मूर्तिजापूरचे माजी आमदार होते. 

हेही वाचा - संजय राऊत, तुमच्या शब्दांवर संयम ठेवा; शरद पवारांवरील टीकेनंतर जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया

प्राप्त माहितीनुसार, गुरुवारी तुकाराम बिडकर यांनी अकोला विमानतळावर कॅबिनेट मंत्री बावनकुळे यांची भेट घेतली. बावनकुळे यांना भेटल्यानंतर बिडकर दुचाकीवरून घरी परतत होते. बिडकर शिवर गावाजवळ पोहोचताच त्यांच्या दुचाकीला पिकअपने धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान बिडकर यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा - छगन कमळ बघ; मुख्यमंत्री फडणवीसांचे सूचक वक्तव्य

कोण होते तुकाराम बिडकर ?

तुकाराम बिरकर हे 2004 ते 2009 पर्यंत आमदार होते. बिडकर यांनी मुर्तिजापूर मतदारसंघातून निवडणूक जिंकली होती. तसेच काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळात ते विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष होते. आमदार होण्यापूर्वी तुकाराम बिडकर यांनी अकोला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद भूषवलं होतं. 
 


सम्बन्धित सामग्री