पुणे : पुण्यातील येवलेवाडी येथे एका काचेच्या कारखान्यात माल उतरवताना काचा फुटल्याने सहा कामगार अडकल्याची माहिती मिळाली आहे. दुपारी दिड वाजताच्या सुमारास ही घटना घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी सहा कामगारांना गंभीर जखमी अवस्थेत बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान चार कामगारांचा मृत्यू झाला आणि दोन जण गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.