३ सप्टेंबर, २०२४, मुंबई : राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाबाबत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेतली. 'गणेशोत्सवावेळी अशी भूमिका घेणे चुकीचं असून गणेशभक्तांचा कर्मचाऱ्यांनी विचार करावा असं आमचं म्हणणं असल्याचं', यावेळी उदय सामंत म्हणाले. 'सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांच्यासोबत देखील मी चर्चा करणार असून त्यांच्यासोबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही बोलतील', असही सामंतांनी सांगितलं. 'सरकार एसटी कर्मचाऱ्यांवर कोणताही अन्याय होऊ देणार नाही', असं आश्वासनंही यावेळी सामंत यांनी पत्रकार परिषदेतून दिलं.