नाशिक: नाशिक सद्या गुन्हेगारीचे क्षेत्र बनत चाललंय की काय असा प्रश्न सर्वांचं पडलाय. काही दिवसांपासून काही ना काही कारणास्तव नाशिक शहर चचर्चेत असते. नाशिक शहरात गुन्हेगारी वाढतांना दिसून येतेय. त्यातच आता अजून एक धक्कादायक माहिती नाशिक शहरातून समोर आलीय.नाशिकच्या पंचवटीतील नागचौक येथे रात्री दहाच्या सुमारास राडा झाल्याचं समोर आलंय. दोन गटांमध्ये जुन्या वादावरून टोळी युद्ध झालं असल्याचं समोर आलं असून या टोळी युद्धात दोन जण जखमी झालेत. त्याचबरोबर हवेत फायरिंग झाल्याचा गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
याप्रकरणी पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये परस्परांविरोधात गुन्हे दाखल केले असून यातील संशयित आरोपी हे फरार आहेत तर दोन जण जखमी आहेत या घटनेने परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली असून या घटनेचा अधिक तपास पंचवटी पोलीस करीत आहेत. दरम्यान शहरातील ही वाढती गुन्हेगारी पाहता पोलिसांमसोर मोठे आवाहन येऊन ठाकले आहे.
या वाढत्या गुन्हेगारीमध्ये तरुणांचा मोठ्या प्रमाणात समावेश असल्याचं देखील पाहायला मिळतंय. यामुळे पालकांमध्ये देखील भीतीचे वातावरण पाहायला मिळतंय. दरम्यान नाशिक शहरातील या वाढत्या गुन्हेगारीला पोलीस आळा कसा घालणार हे पाहून महत्वाचं ठरणार असून या टवाळखोर गुन्हेगारांवर काय कारवाई होणार हे पाहणं महत्वाचं ठरणारे.