Saturday, February 08, 2025 02:51:06 PM

Manoj Jarange
सरकारी नोंदींप्रमाणे मराठ्यांना कुणबी आरक्षण द्या; जरांगेंची मागणी

जालनातील अंतरवाली सराटी येथे जरांगेंनी उपोषणाला सुरूवात केली आहे.

सरकारी नोंदींप्रमाणे मराठ्यांना कुणबी आरक्षण द्या जरांगेंची मागणी

मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणाला बसले आहेत. जालनातील अंतरवाली सराटी येथे जरांगेंनी उपोषणाला सुरूवात केली आहे. आज सातव्यांदा त्यांनी उपोषणाला सुरूवात केली आहे. यावेळी 7 ते 8 मागण्यांसाठी त्यांनी उपोषण केले आहे. सरकार नवं मात्र मागण्या त्याच असल्याचे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी जय महाराष्ट्र मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

हेही वाचा : मनोज जरांगेंचं आमरण उपोषण

सरकारी नोंदींप्रमाणे मराठ्यांना कुणबी आरक्षण द्या. सरकारनं नव्या नोंदी शोधणं पूर्ण बंद केल्या असल्याचे जरांगे यांनी सांगितले आहे. मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण द्यावं. ओबीसी कायद्यात सुधारणा करून मराठ्यांना आरक्षण द्या. तसेच ओबीसीतील सगळ्या जातीचे सगे-सोयऱ्यांना आरक्षण द्या असेही त्यांनी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले.

मराठ्यांना आरक्षण मिळण्यासाठी जरांगेंनी सातव्यांदा उपोषण केले आहे. यावेळी त्यांनी वेगवेगळ्या मागण्या केल्या आहेत. कुणबी नोंद सापडलेल्यांना पोटजात म्हणून आरक्षण द्या असेही मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगे यांनी सातत्याने सरकारला धारेवर धरले आहे. फडणवीसांनी आधी सांगितलेलं मी अडवत नाही, मग आता आरक्षण द्या अशी मागणी जरांगेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

दरम्यान जरांगे यांनी निवडणुकीवरही भाष्य केले आहे. मराठ्यांशिवाय राज्यात कोणाची सत्ता येऊ शकत नाही. मी राजकारणाच्या नादी लागणार नाही. यापुढे निवडणूका लढणार नसल्याचं जरांगेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मराठा आरक्षणाविरोधातल्या दोषींना समोर आणणार असल्याचंही मनोज जरांगे यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शंभर टक्के आमच्या मागण्या पूर्ण करतील असा विश्वास यावेळी जरांगेंनी व्यक्त केला.

मराठ्यांची मोठी प्रगती येत्या 4-5 वर्षांत दिसेल. कायदेशीर लढाई लढून आमचे अभ्यासक म्हातारे झाले. नोंदणी सापडूनही अधिकारी आरक्षण प्रमाणपत्र देत नाही. ईडब्लूएस घालवलं मग सरसकट आरक्षण का देत नाही असा सवाल मनोज जरांगे यांनी सरकारला केला आहे.


सम्बन्धित सामग्री