Sunday, February 09, 2025 06:19:31 PM

Manoj Jarang's warning to the government
गनिमी काव्याने आंदोलन करणार; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आज पत्रकार परिषद घेतली.

गनिमी काव्याने आंदोलन करणार मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

छत्रपती संभाजीनगर : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी गनिमी काव्याने आंदोलन करणार असल्याचा सरकारला इशारा दिला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

आम्ही याची तारीख जाहीर करू आता आम्ही तिथुन उठणार नाही. आता कायम मुंबईत बसणार आहे. मैदान पाहणी करायला कधी जाणार याची आम्ही तारीख जाहीर करु.मुंबईत जाऊन उपोषण करणार नाही. आमची शक्ती दाखवू आंदोलनाच स्वरूप आम्ही सांगणार नाही गनिमी कावा आंदोलन करणार याची माहिती मुख्यमंत्री, राज्यपाल राज्याला देणार असेही जरांगे यांनी म्हटलंय.

आरक्षण दिल्याशिवाय एक इंचही मागे हटणार नाही

मराठा समाजाच्या एकाही विद्यार्थ्यांने आत्महत्या करू नये. एका टक्क्याहून हुकलात तरी पुन्हा लढून जिंकू पण आत्महत्या कुणीही करू नका. सगळ्यांना आरक्षण दिल्याशिवाय एक इंचही मागे हटणार नाही. असे आश्वासन मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केले आहे. आंदोलनात असणाऱ्या आणि नसणाऱ्यांसाठी लढतोय.

हेही वाचा : साताऱ्यातील बड्या नेत्याच्या घरी छापेमारी

प्रामाणिकपणे समाजासाठी लढत आहे. त्यामुळे कुणीही आत्महत्या करू नका. कितीही ताकद लावेन पण आरक्षण दिल्याशिवाय माघार घेणार नाही. आता लढून आरक्षण मिळवायचं आहे. आतापर्यंत कायदेशीर लढाई केली. पावणेदोन वर्ष लढलो. सरकारला जर हे जमत नसेल तर रस्त्यावर उतरून लढू असा इशारा जरांगेंनी दिला आहे.

तुमच्या लेकत तुम्ही आमच्या मुलांना का बघत नाही?’

फडणवीसांमध्ये काल बापाची माया दिसून आली. मुलींची परीक्षा झाल्यावर ते वर्षात राहायला जाणार आहेत. लेकीच्या शब्दाच्या पलीकडे तुम्ही जात नाहीत. ती मोठी व्हावी त्यासाठी आमच्याकडून शुभेच्छा! पण तुमच्या लेकत तुम्ही आमच्या मुलांना का बघत नाही? मग तुम्हाला का आमच्या पोराची माया येत नाही असा सवाल जरांगेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला आहे.

फडणवीस साहेब तुमची नियत चांगली नाही. तुम्हाला जशी तुमच्या लेकीसाठी तळतळ आहे. तशी तळतळ आमच्या लेकरांसाठी असू द्या. फडणवीस स्वतःच्या मुलीची परीक्षा असल्याने 500 मीटरवर राहायला जात नाही. मग मराठ्यांच्या मुलांबाबत ही माया का नाही, कधी देणार आम्हाला आरक्षण,आता मराठ्यांनी डोळे उघडावे असे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : गनिमी काव्याने आंदोलन करणार; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

गाठीभेटी नियोजन करणार

22 फेब्रुवारी ते 22 मार्चपर्यंत गाठीभेटी नियोजन करणार आहे. राज्यातील प्रत्येक गावातील अडचण आम्हाला समजायला हवी. 22मार्च पर्यत आम्हाला भेटण्यासाठी येण्याचे आवाहन मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला केले आहे. आता अनेक गाव जोडणार आहे. या महिन्यात गरीब लोक थेट छत्रपती भवनाला जोडणार आहेत. आम्हाला लोकांना जोडायचं आहे. सगळ्या क्षेत्रांतील लोकांना छत्रपती भवनाशी जोडणार आहे. एक महिन्याच्या कालावधीत कधीही आम्हाला भेटण्यासाठी या. तुमच्या अडचणी सोडवू. प्रत्येकाची अडचण छत्रपती भवनातून सोडवू. आम्ही लोकांच्या कामात हातभार लावू. गरीबानेच या चळवळीत उभे राहावे. 22 फेब्रुवारीपासून छत्रपती भवन,पैठणफाटा शहागड येथे येऊन आपली समस्या सोडवून घ्यावी असे आवाहन जरांगेंनी मराठा बांधवांना केली आहे. आता लोकांना जोडणं महत्वाचं आहे. सलग एक महिना लोकांना जोडण्याचं काम करणार आहे. खान्देश, विदर्भ, कोकण सगळ्या लोकांनी आमच्याकडे यावे. कुणबी मराठा एकच आहेत. कुणीही भेदभाव ठेऊ नये. स्वतःहून आमच्याकडे या. कनेक्टिव्हिटी मोहिमेत सहभागी व्हा असेही त्यांनी म्हटले आहे.


सम्बन्धित सामग्री