Monday, February 17, 2025 12:15:15 PM

Pune
पुण्यात गुइलेन बेरी सिंड्रोमचे रूग्ण वाढले

गुइलेन बॅरी सिंड्रोमचा अर्थात (जीबीएस) धोका पुणे जिल्ह्यात वाढला आहे.

पुण्यात गुइलेन बेरी सिंड्रोमचे रूग्ण वाढले

पुणे : गुइलेन बॅरी सिंड्रोमचा अर्थात (जीबीएस) धोका पुणे जिल्ह्यात वाढला आहे. शनिवारी पुण्यात सहा नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 73 वर पोहोचली आहे. शहरी भागाच्या तुलनेत जिल्ह्याच्या ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढत आहे. आतापर्यंत आढळून आलेल्या एकूण रुग्णांमध्ये जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील 44 रुग्णांचा समावेश आहे. तर पुणे शहरात 11 आणि पिंपरी-चिंचवड शहरात 15 रुग्णांची नोंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुणे जिल्हाधिकाऱ्यांसह सर्वच विभागाची बैठक घेत प्रशासनाला सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

काय आहे गुइलेन बॅरे सिंड्रोम?

गुइलेन बॅरी सिंड्रोम म्हणजेच जीबीएस सिंड्रोम हा न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरचा एक प्रकार आहे.  यामुळे शरीरातील स्नायु कमकुवत होतात, स्नायूंची संवेदना कमी होतात. याची सुरुवात सामान्य लक्षणांनी होते. जसे की, हातांना मुंग्या येणे, अशक्तपणा जाणवणे. बहुतांश लोक या आजारातून बरे होतात. बरे होण्याचा कालावधी रुग्णाच्या प्रतिकारशक्तीवर अवलंबून असतो.

हेही वाचा : महाराष्ट्रातील 48 पोलिसांना राष्ट्रपती पदक जाहीर

या नव्या आजाराने पुण्यातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे.  पुण्यात GBSचे रुग्ण आणि परिस्थितीचा अहवाल तयार करून उपाययोजनांसाठी काम केले जाणार असून केंद्रीय पथक पाहणीसाठी येणार आहे.

शहरात पसरलेल्या या दुर्मिळ आजाराच्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी पुणे महानगरपालिका व स्वयंसेवी संस्थेच्या सहभागाने शीघ्रकृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. नागरिकांनी या आजाराला न घाबरता लक्षणे दिसताच संबंधितांशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं.


सम्बन्धित सामग्री