श्रीधर वाळवंटे, प्रतिनिधी हिंगोली : "सुंदर हस्ताक्षर, चांगल्या व्यक्तिमत्त्वाचा दागिना आहे" असे म्हटले जाते, आणि हिंगोली जिल्ह्यातील गुगुळपिंपरी येथील पांडुरंग चोपडे यांचे जीवन हे याचं प्रमाणे आहे. पंधरा वर्षांपासून शालेय विद्यार्थ्यांना हस्ताक्षराची कला शिकवणारे पांडुरंग चोपडे यांचं कार्य नक्कीच प्रेरणादायक आहे. त्यांनी आतापर्यंत सहा लाख विद्यार्थ्यांना मोफत हस्ताक्षराचे धडे दिले आहेत.
पांडुरंग चोपडे यांच्या कार्यशाळेचा उद्देश विद्यार्थ्यांच्या हस्ताक्षरातील वळणाचा आणि सुधारण्याचा आहे. त्यांना विश्वास आहे की, शालेय जीवनातच सुंदर हस्ताक्षर शिकल्यास विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व अधिक प्रगल्भ आणि सुंदर होऊ शकते. यासाठी त्यांनी वसमतच्या दोन इंग्रजी शाळांमध्ये सुंदर हस्ताक्षर कार्यशाळा घेतल्या. तहसीलदार शारदा दळवी यांच्या उपस्थितीत या कार्यशाळेचा समारोप करण्यात आला.
👉👉 हे देखील वाचा : "तुम्हाला कुठे अडचण आली तर बिनधास्त ठोकून काढा''
पांडुरंग चोपडे यांचे कार्य विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी खूप महत्त्वाचे आहे, कारण एक चांगलं हस्ताक्षर विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला एक सकारात्मक ओळख देतं. कार्यशाळांमध्ये विद्यार्थ्यांना अक्षर सुंदर व वळणदार कसे करावे, याबद्दल मार्गदर्शन केलं जातं. यामुळे विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व आणि कार्यक्षमता सुधरते. विद्यार्थ्यांचे सुधारणारे हस्ताक्षर पाहून त्यांच्या पालकांनाही आनंद झाला आहे, आणि त्यामुळे शाळेतील वातावरण सुधारण्यास मदत होते.
लालबहादूर शास्त्री व लिटल किग्ज शाळेमध्ये पांडुरंग चोपडे यांनी गेल्या दहा दिवसांपासून स्वच्छ व सुंदर हस्ताक्षर कार्यशाळा घेतली आहे. यात विद्यार्थ्यांच्या आधीच्या हस्ताक्षरातील चांगला बदल झाला आहे. पालक देखील आपल्या मुलांचे सुधारलेले हस्ताक्षर पाहून खुश आहेत.
तहसीलदार शारदा दळवी यांनी या कार्यशाळेचे महत्त्व ओळखून, ग्रामिण भागातील जिल्हा परिषद शाळांमध्ये देखील अशा कार्यशाळांचा आयोजन करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. "माझ्या तालुक्याच्या शाळांमध्ये हस्ताक्षर स्वच्छ आणि सुंदर व्हावे," असे त्या म्हणाल्या.
पांडुरंग चोपडे यांचा ध्येय एकच आहे, आणि ते म्हणजे हिंगोली जिल्ह्यातील प्रत्येक विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर सुंदर आणि मोत्यासारखे बनविणे. ते म्हणतात, "हस्ताक्षर चांगले असणे, व्यक्तिमत्त्वासाठी महत्त्वाचे आहे. ज्याचं हस्ताक्षर चांगले असते, त्याचे व्यक्तिमत्त्व देखील चांगले असते." यामुळे त्यांचा प्रयत्न केवळ विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व सुधारण्याचा नाही, तर त्यांची शालेय कामगिरी देखील सुधारण्याचा आहे.
चोपडे यांना विश्वास आहे की, जिल्हाधिकारी यांची परवानगी मिळाल्यास जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये सुंदर हस्ताक्षर कार्यशाळा घेता येईल. त्यांचे शिक्षण आणि काम हा त्यांचा छंद आहे आणि ते त्याला पूर्णतः समर्पित आहेत.
👉👉 जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.