Sunday, February 16, 2025 10:37:01 AM

Increase in the number of GBS patients in Satara
साताऱ्यातच्या GBSच्या रुग्णसंख्येत वाढ,GBS टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी?

राज्यात गुलेन बॅरी सिंड्रोम (Guillain Barre Syndrome - GBS) रुग्णांची संख्या वाढत आहे, पण दिलासादायक बाब म्हणजे अनेक रुग्ण उपचारानंतर ठणठणीत बरे होत आहेत. सातारामध्ये 6 संशयित रुग्ण आढळले असून...

साताऱ्यातच्या gbsच्या रुग्णसंख्येत वाढgbs टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी

सातारा: राज्यात गुलेन बॅरी सिंड्रोम (Guillain Barre Syndrome - GBS) रुग्णांची संख्या वाढत आहे, पण दिलासादायक बाब म्हणजे अनेक रुग्ण उपचारानंतर ठणठणीत बरे होत आहेत. सातारामध्ये 6 संशयित रुग्ण आढळले असून, यातील 1 रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 5 रुग्णांवर उपचार सुरू आहेत आणि त्यांची प्रकृती स्थिर आहे.

राज्यात GBS रुग्णसंख्या किती?

 एकूण रुग्णसंख्या – 168
 गावांतील रुग्ण – 86
 पुणे महापालिका हद्दीतील रुग्ण – 32
 पिंपरी-चिंचवड हद्दीतील रुग्ण – 18
 ग्रामीण भागातील रुग्ण – 19
 इतर जिल्ह्यातील रुग्ण (पुण्यात उपचार घेत असलेले) – 8
 आत्तापर्यंत बरे झालेले रुग्ण – 47
 सध्या ICU मध्ये उपचार घेत असलेले रुग्ण – 47
 व्हेंटिलेटरवर असलेले गंभीर रुग्ण – 21

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

GBS म्हणजे काय?

गुलेन बॅरी सिंड्रोम (GBS) हा एक दुर्मिळ आजार आहे ज्यामुळे स्नायूंची कमजोरी आणि बधीरपणा येतो. या आजारात शरीराची प्रतिकारशक्ती स्वतःच्या स्नायूंवर हल्ला करते, ज्यामुळे रुग्णाला हालचाल करण्यात अडथळा येतो.

हेही वाचा:  मुंबई महापालिकेचा 74 हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर!

GBS होण्याची शक्यता कोणाला जास्त असते?

जंतूसंसर्ग (बॅक्टेरियल किंवा व्हायरल इन्फेक्शन) झालेल्या व्यक्तींना
 अतिसार किंवा पचनासंबंधी समस्या सतत जाणवणाऱ्या लोकांना
दूषित अन्न व पाणी सेवन करणाऱ्यांना

GBS ची लक्षणे कोणती?

 हाता-पायात अचानक कमजोरी येणे
 चालायला किंवा उभे राहायला त्रास होणे
जास्त दिवस अतिसार झालेला असणे
गिळण्यास किंवा बोलण्यास त्रास होणे

हेही वाचा: एअरफोनचा जास्त वापर करताय? मग सावधान

GBS टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी?

शुद्ध आणि स्वच्छ पाणी प्या – पाणी उकळून किंवा गाळून प्यावे
 ताजे व स्वच्छ अन्न खा – शिळे किंवा अर्धवट शिजलेले अन्न टाळा
 व्यक्तिगत स्वच्छता ठेवा – हात वारंवार धुवा
 रस्त्यावरील आणि उघड्यावरचे अन्न टाळा
 ताप, जुलाब, अशक्तपणा आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या

GBS टाळण्यासाठी सर्वांनी दक्षता घ्यावी! शुद्ध पाणी, स्वच्छ अन्न आणि चांगल्या आरोग्यसवयी ठेवा!


सम्बन्धित सामग्री