१२ ऑगस्ट, २०२४, रायगड : कर्जतमधील वीज ग्राहक संघर्ष समितीच्यावतीने सोमवारपासून महावितरण विरोधात टिळक चौकात बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आलं आहे. सतत वीज पुरवठा खंडित होणे, निकृष्ट सेवा तसेच भरमसाठ वीजदेयके या विरोधात संघर्ष समितीने लढा उभारला आहे. महावितरणच्या विरोधात मागील महिन्यात भर पावसात कर्जतकरांनी मोठा मूक मोर्चा काढला होता. तेव्हां सेवा सुरळीत करण्यात आश्वासन देण्यात आले होते. परंतु कुठलीच सुधारणा न झाल्याने हे आंदोलन पुकारण्यात आले आहे.