मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात पुण्यात मराठा सेवक आणि शिवप्रेमीनी तीव्र आंदोलन केलं. महाराजांचा अपमान करणाऱ्या सोलापूरकर यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
राहूल सोलापूकर यांनी एका मुलाखतीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्र्याच्या सुटकेबाबत आक्षेपार्ह विधाने केली होती. त्यावरून राहूल यांच्यावर सर्व स्तरातून टीकेची झोड उठली होती. शिवप्रेमींनी ठिकठिकाणी आंदोलने केली. पुण्यात झालेल्या आंदोलनात राहुल सोलापूरकर यांचं भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेतील सदस्यत्व रद्द करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे.
हेही वाचा : खासदार उदयनराजे राहुल सोलापूरकरावर संतापले; काय म्हणाले?
सोलापूरकर काय म्हणाले?
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संपूर्ण इतिहासामध्ये आग्र्याच्या सुटकेला मोठं महत्व आहे. मात्र, राहुल सोलापूरकरांनी मुलाखतीत वादग्रस्त दावा केला आहे. औरंगजेबाने महाराजांना नजरकैदेत ठेवलं होतं. आग्र्यातून सुटकेसाठी पेटारे-बिटारे असं काहीच नव्हतं. महाराज औरंगजेबाच्या सरदारांना लाच देऊन आग्र्याहून महाराष्ट्रात परतले. आग्र्यातून सुटकेचा इतिहास आपण अभिमानाने सांगतो.
हेही वाचा : गनिमी काव्याने आंदोलन करणार; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
राहूल सोलापूरकर यांनी माफी मागितली असली तरी त्यांना माफ करू नये अशा आशयाचे पत्र राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी राज्यपालांना दिलं आहे. राहूल सोलापूरकर यांनी माफी मागितली नाहीतर त्यांचा करेक्ट कार्यक्रम केला असता असा थेट इशारा कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी दिला आहे.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्र्यातील सुटकेबाबत राहुल सोलापूरकर यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राजकीय आणि शिवप्रेमींनी तीव्र संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबच वक्तव्य कऱणाऱ्या विकृत मनोवृत्ती ठेचून काढायला हव्यात, अशी भावना राजकीय नेते आणि तमाम शिवप्रेमींनी व्यक्त केली आहे.