पुणे: महाराष्ट्राच्या मातीत खेळला जाणारा कुस्ती हा फक्त एक खेळ नसून एक सांस्कृतिक वारसा आणि अभिमानाचा विषय आहे. मात्र, नुकत्याच झालेल्या अहिल्यानगरमधील कुस्तीपटू पृथ्वीराज मोहळ आणि शिवराज राक्षे यांच्यातील चुरशीच्या सामन्यात आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच नितीश काबलिये यांच्या वादग्रस्त निर्णयामुळे खळबळ उडाली.
यानंतर, महाराष्ट्र राज्य कुस्ती संघटनेने कठोर पाऊल उचलत आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच नितीश काबलिये यांना तीन वर्षांसाठी राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत सहभागी होण्यास बंदी घालण्यात आली आहे. या प्रकरणामुळे कुस्ती उद्योगातील निष्पक्षतेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. चला तर सविस्तर जाणून घेऊया.
यंदाच्या स्पर्धेमध्ये पृथ्वीराज मोहळ आणि शिवराज राक्षे यांच्यात झालेल्या कुस्तीने सर्वांचे लक्ष वेधले. मात्र, या सामन्यादरम्यान पंच नितीश काबलिये यांनी घेतलेल्या एका निर्णयामुळे वाद निर्माण झाला. या एका निर्णयामुळे सामन्याचा निकालच बदलला गेला, ज्यामुळे खेळाडू आणि प्रेक्षकांमध्ये असंतोष निर्माण झाला. 'हा निर्णय चुकीचा आहे', असा आरोप करत कुस्तीप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी स्वतंत्र समितीची स्थापना:
या वादानंतर महाराष्ट्र राज्य कुस्ती संघटनेने तात्काळ कारवाई केली. त्यासोबतच, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी एक स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली. समितीने सामन्याचे रेकॉर्डिंग, खेळाडूंचे जबाब आणि इतर पुरावे तपासले. चौकशीनंतर असे निष्पन्न झाले की, 'आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच नितीश काबलिये यांनी नियमांचे उल्लंघन करून चुकीचा निर्णय घेतला आहे', असे स्पष्ट झाले. ज्यामुळे समितीच्या अहवालात आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच नितीश काबलिये यांना दोषी ठरवण्यात आले आणि कुस्ती संघाला कठोर निर्णय घ्यावा लागला.