Monday, February 10, 2025 12:53:13 PM

Naxalites killed former Speaker
घरातून उचलून घेऊन जात माजी सभापतीची हत्या; नक्षलवाद्यांचा संतापजनक प्रकार उघड

गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील एका गावालगत माजी सभापतीची हत्या करण्यात आली.

घरातून उचलून घेऊन जात माजी सभापतीची हत्या नक्षलवाद्यांचा संतापजनक प्रकार उघड

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील एका गावालगत माजी सभापतीची हत्या करण्यात आली. माजी सभापतींना घरातून उचलून नेऊन हत्या करण्यात आली. 


जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

माजी सभापतींची गावालगत असलेल्या क्रिकेट ग्राऊंडवर बेदम मारहाण करत हत्या केली. विशेष म्हणजे यावेळी नक्षलवाद्यांनी त्यांच्या तोंडाला बांधून फाशी लावून मारल्याचे बोलले जात आहे. सुखराम मडावी यांची हत्या केल्यावर नक्षलवाद्यांनी पत्रके देखील टाकली आहेत. सरकारच्या कठोर धोरणामुळे मागील काही महिन्यात नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला आहे. बऱ्याच नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण देखील केले आहे. जिल्ह्यात नक्षलवाद संपुष्टात येत असला तरी पुन्हा नक्षलवाद्यांच्या हत्येने दहशत निर्माण झाली आहे.

हेही वाचा : पोलिसांनी तक्रार न घेतल्याने तृतीपंथीयाने केले असे कृत्य, पाहून बसेल धक्का
 

भामरागड तालुक्यातील एका माजी सभापतीची हत्या केली आहे. सुखराम महागु मडावी असे त्यांचे नाव आहे. ते भामरागड पंचायत समितीचे माजी सभापती होते. मिळालेल्या माहितीनुसार शनिवार 1 फेब्रुवारी रोजी रात्री 11 वाजताच्या सुमारास काही नक्षलवाद्यांनी कियर गाठून सुखराम मडावीला घरातून गावाबाहेर नेले.  गावालगत असलेल्या क्रिकेट ग्राऊंडवर त्यांना बेदम मारहाण करत त्यांची हत्या केली. विशेष म्हणजे यावेळी नक्षलवाद्यांनी त्यांच्या तोंडाला बांधून फाशी लावून मारल्याचे बोलले जात आहे. सुखराम मडावी यांची हत्या केल्यावर नक्षलवाद्यांनी पत्रके देखील टाकली आहेत. नेमकं त्या पत्रकात काय लिहिले आहे आणि हत्येचा कारण काय हे कळू शकले नाही.

हेही वाचा : चंद्रशेखर बावनकुळे वादात: सोन्याचा मुकुट का झाला चर्चेचा विषय?

भामरागड तालुका मुख्यालयापासून कियर हे गाव जेमतेम 12 किलोमीटर अंतरावर आहे. या घटनेमुळे परिसरात पुन्हा एकदा नक्षलवाद्यांची दहशत निर्माण झाली आहे. मृतदेह भामरागड येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी घेऊन जात असल्याची माहिती मिळाली आहे. सरकारच्या कठोर धोरणामुळे मागील काही महिन्यात नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला आहे. बऱ्याच नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण देखील केले आहे. जिल्ह्यात नक्षलवाद संपुष्टात येत असला तरी पुन्हा नक्षलवाद्यांनी केलेल्या हत्येमुळे दहशत निर्माण झाली आहे. 


सम्बन्धित सामग्री