Friday, June 13, 2025 07:05:53 PM

मांगेली गावात भूस्खलन

दोडामार्ग तालुक्यातील मांगेली गावात भूस्खलन होऊन डोंगर घसरून रस्त्यावर आला आहे. ही घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली.

मांगेली गावात भूस्खलन 
landslide

३१ जुलै, २०२४, सिंधुदुर्ग : दोडामार्ग तालुक्यातील मांगेली गावात भूस्खलन होऊन डोंगर घसरून रस्त्यावर आला आहे. ही घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली. मांगेली गावातील कुसगेवाडी आणि देऊळवाडी या दोन्ही वाड्यांमध्ये जाणारा रस्ता बंद झाला आहे. डोंगराची माती रस्त्यावर आल्याने पहिली सकाळची बस मांगेलीत अडकून पडली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांसह नोकरीनिमित्त जाणाऱ्यांची गैरसोय झाली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. यापूर्वी या भागात भूस्खलन झाल्याच्या आठवणी मांगेली ग्रामस्थांच्या मनात उमटल्या त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण आहे.
 


सम्बन्धित सामग्री