महाराष्ट्र: महाराष्ट्रात राजकीय वातावरण कधी बदलेल सांगता येत नाही त्यातच आता सर्वत्र चर्चा सुरु आहे ती राज्यात 23 तारखेला होणाऱ्या भूकंपाची. एकनाथ शिंदे यांची गरज भाजपच्यादृष्टीने संपलेली आहे, त्यामुळे नवा ‘उदय’ होईल, असे विधान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केले. तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाचे नेते, माजी खासदार राहुल शेवाळे यांनी मोठा दावा केलाय. राज्यात 23 तारखेला मोठा भूकंप होणार असून काँग्रेस आणि ठाकरे गटाचे काही आमदार शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा माजी खासदार राहुल शेवाळे यांनी केलाय.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
काय म्हणाले राहुल शेवाळे?
काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार आमच्या संपर्कात आहेत. आपल्या पक्षाचे अस्तित्व टिकविण्यासाठी संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार काहीतरी विधाने करतात. काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात काम करण्यास इच्छुक आहेत, असा गौप्यस्फोट करीत दुसऱ्याच्या उदयापेक्षा स्वत:च्या अस्ताची काळजी घ्या, असा सल्ला शेवाळे यांनी राऊत-वडेट्टीवारांना दिला.
दरम्यान एकनाथ शिंदे यांची गरज भाजपच्यादृष्टीने संपलेली आहे, त्यामुळे नवा ‘उदय’ होईल, असे विधान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केले होते तर मागे एकनाथ शिंदे रुसले होते, तेव्हाच ‘उदय’ होणार होता. माझ्याकडच्या माहितीनुसार उदय सामंत यांच्यामागे 20 आमदारांचे बळ आहे, असे वक्तव्य शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केले होते यावर आता पलटवार करत माजी खासदार राहुल शेवाळे राज्यात २३ तारखेला मोठा भूकंप होणार असल्याचं वक्तव्य केलंय .