Monday, February 17, 2025 01:47:07 PM

सत्यनारायण पूजा आणि हळदी कुंकू कार्यक्रमाला वाद
डोंबिवलीतील सोसायटीत मराठी विरुद्ध अमराठी वाद

सत्यनारायण पूजा आणि हळदी कुंकू कार्यक्रमाला अमराठिचा विरोध ,मराठी अमराठी आपापसात भिडले

डोंबिवलीतील सोसायटीत मराठी विरुद्ध अमराठी वाद

कल्याण डोंबिवलीत पुन्हा एकदा मराठी विरुद्ध अमराठी असा वाद उफाळून आलाय . डोंबिवली नांदीवलीमधील एका सोसायटीत सत्यनारायण व हळदीकुंकू समारंभाला मराठी कुटुंबीयांना विरोध तसेच मराठी माणसांना अपशब्द वापरल्याचा आरोप सोसायटीत राहणाऱ्या मराठी कुटुंबांतील महिलांनी केलाय. संबंधित सोसायटीमध्ये या वादातून मोठा गोंधळ झालाय. या गोंधळाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय . याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार देखील नोंदवण्यात आलीय . याप्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरू केलाय.

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

गेल्या काही महिन्यांपासून मुंबई ,ठाणे ,कल्याण डोंबिवली,नवी मुंबई ,पनवेल मध्ये मराठी विरुद्ध परप्रांतीय असे वाद अनेकदा घडल्याचे पाहायला मिळाले . डोंबिवली पुन्हा एकदा मराठी विरुद्ध अमराठी वाद उफाळून आलाय . डोंबिवली पूर्वेकडील नांदिवली परिसरात साई कमल छाया या इमारतीमध्ये येत्या 2 फेब्रुवारी रोजी सत्यनारायण पूजा व हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आलं आहे . 

या कार्यक्रमाबाबत सोसायटीच्या बोर्डवर लिहिण्यात आले होते. सोसायटीतील काही अमराठी सदस्यांनी या बोर्डचा फोटो काढून सोसायटीच्या व्हाट्सअप ग्रुप वर अपशब्द वापरले. त्यामुळे या सोसायटीमध्ये  मराठी विरुद्ध अमराठी असा वाद उफाळून आलाय . सोसायटीमध्ये या वादातून मोठा गोंधळ झाला. या गोंधळाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय .

याबाबत मराठी कुटुंबाने आरोप केलाय की,"अमराठी कुटुंबीयांनी या कार्यक्रमाला विरोध केला आम्हाला शिवीगाळ केली व मराठी माणसांबद्दल अपशब्द वापरले". याप्रकरणी या सोसायटीमध्ये राहणाऱ्या मराठी कुटुंबीयांनी मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवलीय . अमराठी कुटुंबियांचे हे प्रकार आम्ही खपवुन घेणार नाही असा इशारा सोसायटीतील मराठी कुटुंबीयांनी दिलाय .मात्र या घटनेमुळे डोंबिवलीत पुन्हा एकदा मराठी विरुद्ध मराठी असा वाद उफाळून आल्याचे पाहायला मिळतेय .
 


सम्बन्धित सामग्री