Monday, February 10, 2025 07:12:23 PM

PRAKASH AMBEDKAR PC
महाराष्ट्रात ऑनर किलिंगवरून जातीय वादाची ठिणगी

माऊली सुत प्रकरणात पोलिसांची निष्क्रियता – प्रकाश आंबेडकर

 महाराष्ट्रात ऑनर किलिंगवरून जातीय वादाची ठिणगी

माऊली सुत प्रकरण : जातीय वाद, पोलिसांची निष्क्रियता आणि सरकारकडून दुर्लक्ष – प्रकाश आंबेडकर यांची संतप्त प्रतिक्रिया

हरियाणात जसे जातीय वाद निर्माण झाले तसेच आता महाराष्ट्रात घडत आहे, असे मत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. बीड जिल्ह्यातील माऊली सुत या १८ वर्षीय विद्यार्थ्याच्या हत्या प्रकरणी आंबेडकर यांनी सरकार व प्रशासनावर कठोर शब्दांत टीका केली.

प्रकरणाचा तपशील:माऊली सुत हा कॉलेजमधील विद्यार्थी होता. त्याच्या गावातील रोहिणी नावाच्या मुलीसोबत त्याचे संबंध होते. मात्र, माऊलीच्या आईने या नात्याला विरोध केला. यानंतर, त्याच दिवशी माऊलीला एका चिट्ठीतून घरी बोलविण्यात आले आणि त्याला अमानुषपणे मारहाण करण्यात आली. बाईकच्या सायलेन्सरने झालेल्या या मारहाणीत त्याच्या हाडांना फ्रॅक्चर झाले. पोलिसांनी त्याला रुग्णालयात नेण्याऐवजी कुटुंबीयांवर ही जबाबदारी टाकली.

माऊली दोन दिवस सेमीकॉन्शियस अवस्थेत राहिला आणि ९ जानेवारी रोजी त्याचा मृत्यू झाला.

प्रकाश आंबेडकरांची टीका :
आंबेडकर यांनी या प्रकरणात पोलिसांनी दाखवलेली निष्क्रियता आणि जातीय भेदभावावर भाष्य केले.

चिट्ठी नोंदवली नाही : माऊलीला मिळालेली मूळ चिट्ठी पोलिसांनी स्वीकारली नाही, तसेच त्यावरील फिंगरप्रिंटची तपासणीही झाली नाही.

डॉक्टरांचे स्टेटमेंट नाही: माऊलीवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे विधान अद्याप नोंदवले गेलेले नाही.

कुटुंब आर्थिक अडचणीत: कुटुंबाने ५ एकर जमीन विकून माऊलीचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न केला.

👉👉 जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

आंबेडकर म्हणाले की, "माऊली सूत प्रकरण हे ऑनर किलिंगचे उदाहरण आहे. जातीय वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न इथे दिसतो. या प्रकरणात स्थानिक आमदारांनी भेट दिली नाही, ना कोणत्याही पक्षाने आवाज उठवला."

जातीय वादाची ठिणगी : या प्रकरणामुळे बीड व लातूर जिल्ह्यात मराठा आणि धनगर समाजांमध्ये वाद निर्माण होण्याची भीती आहे. आंबेडकर यांनी पोलिसांवर व प्रशासनावर जातीय विषारी मानसिकता शिरकाव करण्याचा आरोप केला आहे.

सरकारकडे मागण्या : आंबेडकर यांनी मुख्यमंत्री व मंत्र्यांना विनंती केली की, महाराष्ट्र हरियाणासारखा होऊ नये, यासाठी शासनाने कठोर पावले उचलावीत.

ऑनर किलिंगसाठी स्पष्ट धोरण आखावे. पीडित कुटुंबाला आर्थिक मदत व न्याय मिळवून द्यावा. पोलिसांवर कारवाई करावी.

👉👉 हे देखील वाचा : धनंजय मुंडे दोषी असल्यामुळे पालकमंत्री पद नाही – संभाजीराजे छत्रपती

प्रकाश आंबेडकर म्हणाले, "जर प्रशासनाने यावर योग्य ती कारवाई केली नाही तर राज्यात जातीय तणावात अधिक वाढ होईल. यासाठी स्थानिक राजकीय नेत्यांनी शांततेसाठी पुढाकार घेतला पाहिजे."


सम्बन्धित सामग्री