Sunday, February 09, 2025 05:44:22 PM

Dhananjay Munde
माझ्याविरोधात मिडिया ट्रायल; धनंजय मुंडेंचा आरोप

बीडमधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागताच मुंडेंनी भगवान गडाचा आसरा घेतला  आहे.

माझ्याविरोधात मिडिया ट्रायल धनंजय मुंडेंचा आरोप

बीड : बीडमधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागताच मुंडेंनी भगवान गडाचा आसरा घेतला  आहे. याप्रकरणी वाल्मिक कराडला अटक होताच मुंडे यांचे पाय अधिक खोलात गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. भगवान गडाचे दर्शन घेतल्यावर तेथील महंत नामदेव शास्त्री यांनी मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीने संपूर्ण समाजाचे नुकसान होत असल्याचा दावा केला आहे. 

हेही वाचा :  किन्नर आखाड्याने केली मोठी कारवाई; ममता कुलकर्णीला पदावरून हटवले, कारण काय?

नामदेव शास्त्री यांनी पाठराखण करताच धनंजय मुंडे यांनीही आपली मिडिया ट्रायल चालली असल्याचा थेट आरोप केला आहे. बीड हत्या प्रकरणी गुन्हेगारांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करणाऱ्या मुंडेनी नैतिकता म्हणून राजीनामा द्यायला हवा अशी मागणी विरोधकांनी आणि महायुतीचे आमदार सुरेश धस यांनी केली आहे. यावर आता महायुतीतून मुंडेंना घरचा आहेर मिळाला आहे. 

हेही वाचा : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्याची सफारी सुरु होणार

बीडमधील राजकारण तापलं असताना आता महायुतीतही धनंजय मुंडे यांच्यावरून राजकीय सल्ला देण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. मुळात या गंभीर विषयावर राजकारण्यांनी राजकारण न करता देशमुख कुटुंबियांच्या न्यायासाठी एकत्र येण्याची आवश्यकता असताना त्यावर पद्धतशीरपणे राजकारण सुरू असल्याचेच स्पष्ट होत आहे. बीड प्रकरणात एक गट आरोप करण्यात आणि एक गट त्याचे खंडण करण्यात व्यस्त असल्याचेच एवढ्या दिवसांनंतर समोर आलं आहे. पोलीस त्यांचा तपास करत आहेत, त्या तपासाची दिशा देशमुखांचे खरे मारेकरी गजाआड करणं आहे की त्यातून राजकीय हिशेब चुकते करणं आहे? याबाबत संभ्रम निर्माण झालाय. 

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.


 


सम्बन्धित सामग्री