Sunday, February 09, 2025 05:51:20 PM

Milind Deora
मिलिंद देवरा यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबईतील वांद्रे येथील सैफ अली खानच्या घरात घूसून सैफवर हल्ला करणारा आरोपी बांगलादेशी असल्याचे पोलीस तपासात समोर आलं आहे.

मिलिंद देवरा यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई : मुंबईतील वांद्रे येथील सैफ अली खानच्या घरात घूसून सैफवर हल्ला करणारा आरोपी बांगलादेशी असल्याचे पोलीस तपासात समोर आलं आहे. यानिमित्ताने मुंबईत राहणाऱ्या लोकांच्या सुरक्षिततेची खबरदारी घ्यावी लागेल. बांगलादेशी घुसखोरांना राज्यातून हाकलून लावण्याची मागणी  शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे. 

मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र

मुंबई अधिक सुरक्षित करण्यासाठी ठोस उपयायोजना करण्याची आवश्यकता आहे. राज्यभरात राहणाऱ्या बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरीतांवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. राज्यभरातील बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरितांचे सखोल ऑडिट करा. अवैधरित्या राज्यात राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना राज्यातून हाकलून लावा. नोकरी देण्यापूर्वी  कागदपत्रांची पडताळणी न करणाऱ्या एजन्सींवर कठोर कारवाई करा. 

हेही वाचा : महादेव मुंडेंच्या हत्या प्रकरणात धस यांचा मोठा खळबळजनक दावा

'बांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी माजी खासदार राहुल शेवाळेंनी अमित शाह यांच्याकडे मागणी केली होती. त्यावर 
केंद्रीय गृहमंत्रालयाचे तातडीनं उचित कारवाईचे आदेश दिल्याची पोस्ट शेवाळे यांनी केली आहे. 

 गृहविभागाचे आभार 

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचे विशेष सर्वेक्षण
दरवर्षी बांगलादेश आणि म्यानमारमधून मोठ्या संख्येने बेकायदेशीर घुसखोर देशात प्रवेश करतात
या घुसखोरांवर कठोर कारवाई करण्याची विनंती केली होती
गृह मंत्रालयाने या प्रकरणात योग्य ती कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले
गृह मंत्रालय आणि गृहमंत्री अमित शहा यांचे आभार

भाजपा नेते किरीट सोमैया यांनी अनेक दिवसांपासून घुसखोर बांगलादेशींचा मु्द्दा धरला आहे. राज्यात राहून घुसखोरी करून अवैधरित्या राहणारे बांगलादेशी देसिघातक कारवायात सक्रिय असल्याचा आरोप त्यांनी याआधी केला आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

सैफ हल्ल्याचा आरोपी हा बांगलादेशी असून त्याने त्याचे नाव बदलून येथे वास्तव्य केले होते. नोकरी मिळवली होती याचा अर्थ अशा घुसखोरांना मदत करणारी टोळी प्रशासनाशी संबंधित असण्याची शक्यता नाकारता येत नाही. 


सम्बन्धित सामग्री