Thursday, March 20, 2025 04:24:35 AM

आईकडून दोन मुलांची गळा दाबून हत्या; नेमकं घडलं काय?

जन्मदात्या आईनेच दोन मुलांची गळा दाबून हत्या केल्याचे घटना घडली आहे.

आईकडून दोन मुलांची गळा दाबून हत्या नेमकं घडलं काय

पुणे : जन्मदात्या आईनेच दोन मुलांची गळा दाबून हत्या केल्याचे घटना घडली आहे. पती पत्नीच्या वादातून माणुसकीचा गळा दाबल्याची घटना घडली आहे. दौंडमधील घटनेनं महाराष्ट्रात खळबळ माजवली आहे. 

जन्म देणाऱ्या आईनेच दोन मुलांची गळा दाबून हत्या केली आहे. एवढे करुन ही महिला थांबली नाही तर तिने पतीवर देखील कोयत्याने वार केले आहेत. यात पती जखमी झाला आहे. दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावामध्ये पत्नीने पतीवर कोयत्याने वार करीत दोन लहान चिमुकल्यांचा गळा दाबून मारल्याचा धक्कादायक घटना घडली आहे. 

हेही वाचा : Delhi Election Results 2025: मोदींनी दिल्लीही जिंकली; आता केंद्रासह देशावर भाजपाचे अधिराज्य

रात्रीच्या दरम्यान पती-पत्नीच्या वादामध्ये आरोपी कोमल मिंढे हिने मुलगा शंभु मिंढे वय 1 वर्ष आणि मुलगी पियू मिंढे वय 3 वर्षे या दोघांचा रात्रीच्या वेळी झोपते गळा दाबून मारले तर पतीला कोयत्याने मानेवर आणि हातावर मारल्याने जखमी झाले असून त्यांना बारामतीमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेत दोन चिमुकल्यांचा जीव गेला.    

नेमंक घडलं काय? 
पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. जन्मदात्या आईनेच मुलांचा  घात केला आहे. पुण्यात एका आईने दोन मुलांची गळा दाबून हत्या केली आहे. रात्रीची वेळ होती. रात्रीच पती आणि पत्नीमध्ये वाद झाला. या वादामध्ये आरोपी आई कोमल हिने एक वर्षाचा मुलगा आणि तीन वर्षाच्या मुलीची गळा दाबू हत्या केली आहे. एवढेच नव्हे तर पतीवर कोयत्याने वार केले आहेत. पत्नी कोमलने पतीच्या मानेवर आणि हातावर वार केला होता. यामुळे पती जखमी झाला आहे. या घटनेनंतर पतीला बारामतीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  
 


सम्बन्धित सामग्री