मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत भाजपवर जोरदार टीका केली आहे. "फडणवीसांनी विरोधी पक्षनेते असताना ज्यांचे राजीनामे मागितले, ते काँग्रेस पक्षाने मान्य केले. आता त्यांची वेळ आहे," असे पटोले यांनी पत्रकार परिषदेत बोलतांना आपले मत व्यक्त केले.
राज ठाकरे यांच्यावर प्रतिक्रिया देण्यास पटोलेंचा नकार
नाना पटोलेंनी राज ठाकरे यांच्या विधानांवर बोलण्यास नकार दिला. "आज त्यांनी जी भूमिका मांडली ती सातत्याने काँग्रेस मांडत आहे. काँग्रेसचे स्वातंत्र्यलढ्यात मोठे योगदान आहे," असे ते म्हणाले. तसेच, "सध्या भाजप जनतेच्या मतांवर डाका टाकत आहे," असा आरोपही पटोलेंनी केला.
भाजपवर पटोलेंचा घणाघात
भाजपवर टीका करताना पटोले म्हणाले की, "मला अपेक्षित आहे की त्यांनी कार्यकर्ते सांभाळायचे की तंबी द्यायची हे भाजपाने ठरवावे." भाजपवर गंभीर आरोप करत म्हटले की, "निवडणूक आयोगाने माहिती लपवली आहे. आता मलाई खायच्या प्रयत्नात आहेत. लाडक्या बहिणींच्या माध्यमातून बांगलादेशी घुसखोरी महिलांनी देखील याचा फायदा घेतला आहे."
👉👉 हे देखील वाचा : अहिल्यानगर की अहमदनगर म्हणायचे ?
"कांदा उत्पादक शेतकऱ्यांना भाव मिळत नाही. 24 लाख 52 हजार विद्यार्थी नोकऱ्यांसाठी अर्ज करत आहेत, मात्र बहिणी-भावांना नोकऱ्यांपासून वंचित ठेवले जात आहे. एसटी बिल वाढले, वीजबिल माफ असताना शेतकऱ्यांना वीजबिल मिळत आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत आणि सरकार मौजमस्ती करत आहे." अशा समस्यांचा पटोलेंनी पाढाच वाचला.
मकोका आणि सरकारच्या भूमिकेवर नानांचे प्रश्नचिन्ह
पटोले म्हणाले, "सत्ता पक्षातील आमदारांचे राजीनामे मागितले जात आहेत. हे रोजच्या मनोरंजनाचा भाग झाला आहे. सरकारमध्ये सगळ्यांना उपमुख्यमंत्री करा, पण महाराष्ट्रातील जनतेला वाऱ्यावर सोडले आहे."
👉👉 हे देखील वाचा : "शरद पवारांना 10 जागा, अजित पवारांना 42? संशोधनाचा विषय!" - राज ठाकरे
"दावोसहून आणलेली गुंतवणूक नेमकी कुठे आहे?" असा सवालही पटोलेंनी केला. "जनतेच्या पैशांवर नेते दौरे करत आहेत. मुख्यमंत्री हे दौरे त्यांच्या घरी बोलवूनही करू शकतात," असा टोलाही त्यांनी लगावला.
मंत्री नितेश राणे यांच्यावर टीका
नितेश राणे यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना पटोले म्हणाले, "मंत्र्यांनी प्रसिद्धीसाठी काम करण्यापेक्षा कॅबिनेटमध्ये चर्चा करावी. मंत्र्यांचे अधिकार कॅबिनेटमध्ये ठरवले जातात."
उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील भेटीवर टीका
या भेटीबाबत विचारले असता पटोले म्हणाले, "महाराष्ट्रात सगळेच भेटतात. मुख्यमंत्री काल आमच्या घरी येऊन गेले. भेटणं- बोलणं होतच असतं. पण चंद्रकांत पाटील यांच्या हातात नेमकं काय उरलंय, हे तपासून पाहायला हवं."
झिशान सिद्दीकी प्रकरण आणि भाजपवर आरोप
झिशान सिद्दीकी यांच्या सुरक्षेबाबत बोलताना पटोले म्हणाले, "भाजपने अनेकांना पोलीस सुरक्षा दिली आहे. याच्या आड भीती दाखवण्याचे काम सुरू आहे. बाबा सिद्दीकी हत्येवेळी बिष्णोई गँगचं नाव घेतलं गेलं. मोहित कंबोजने धमकी दिल्याचे सांगितले जात आहे. मग सरकार आणि पोलीस याकडे का दुर्लक्ष करत आहेत?"
👉👉 जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
पटोले यांनी भाजपवर गंभीर आरोप करत सांगितले की, "भाजप गुन्हेगारांना पाठिंबा देत आहे का? भाजप सत्तेचा दुरुपयोग करत आहे. मुख्यमंत्री यांनी याबाबत स्पष्ट भूमिका मांडली पाहिजे."
धनंजय मुंडे राजीनाम्यावर प्रतिक्रिया
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर पटोलेंनी भाष्य करताना सांगितले, "फडणवीस यांनी विरोधी पक्षात असताना अनिल देशमुख, संजय राठोड, अजित पवारांचा राजीनामा मागितला होता. आता फडणवीस यांच्यावरही हीच वेळ आली आहे!"