पुणे: पुण्यामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण दिवसानुदिवस वाढत असल्याचं पाहायला मिळतंय. दररोज नवनवीन घटना पुण्यातून समोर येत असल्याचं दिसून येतंय. काही दिवसांपूर्वीच पुण्यातून शिवशाही बस प्रकरणामुळे पुणे शहर हादरलं होत. त्यातच आता पुण्यातूनच अजून एक धक्कादायक बातमी समोर आलीय. आपल्याच लेकाला बापाने संपल्याचं पाहायला मिळतंय. या घटनेने संपूर्ण पुणे शहर हादरलं आहे. पत्नीसोबत झालेल्या भांडणाच्या रागातून या नराधम बापाने आपल्या पोटच्या साडेतीन वर्षाच्या मुलाचा खून केलाय. पुण्यातील खराडी चंदननगर भागातील ही घटना आहे. या संपूर्ण घटनेने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जातेय.
हेही वाचा: Mumbai: तीव्र उन्हळ्यात मुंबईकरांचा प्रवास सुखकर होणार
धक्कादायक म्हणजे मुलाचा खून करून मुलगा हरवल्याचा बनाव देखील या नराधम बापाने केल्याचं समोर आलंय. दरम्यान पोलिसांना संशय आल्याने त्यांनी या नराधम बापाची अधिक चौकशी केली असता त्याने ही कबुली दिलीय. दरम्यान पती पत्नीच्या वादातून या साडेतीन वर्षच्या मुलाचा बापानेच खून केल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात असुन आता काय कारवाई होणार हे पाहणं महत्वाचं ठरणारे.
पुण्यातील ही वाढती गुन्हेगारी बघता पोलीस आता या सर्वावर कस नियंत्रण आणणार हे पाहणं महत्वाचं ठरणारे. दरम्यान पुण्यातून दररोज नवनवीन घटना उघडकीस येत असल्याने शिक्षणाचं माहेघर आता गुन्हेगारीचं माहेरघर बनलाय की काय असा प्रश्न सर्वानाच पडलाय.