बीडच्या राजकारणात सध्या संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणामुळे मोठी उलथापालथ होत आहे. या प्रकरणात अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप होत आहेत. विशेषतः, अटकेत असलेल्या वाल्मिक कराड यांच्याशी मुंडे यांचे जवळचे संबंध असल्याचा विरोधकांचा दावा आहे. त्यामुळे विरोधी पक्ष धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने करत आहे.
या पार्श्वभूमीवर भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण करत त्यांच्यावर होणाऱ्या आरोपांना खंडन केले आहे. “मुंडे यांच्या नावाला कलंक लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा कोणताही पुरावा नाही, तरीही त्यांना गुन्हेगार ठरवले जात आहे,” असे शास्त्री यांनी म्हटले आहे.
👉👉 हे देखील वाचा : "भाजपालाही वाटतं की मी त्यांच्यासोबत असावं" - भुजबळ
महंत नामदेव शास्त्री यांनी माध्यमांसमोर बोलताना सांगितले की, "मुंडे हे खंडणी घेऊन जगणारे माणूस नाहीत. या आरोपांमुळे सांप्रदायाचेही नुकसान होत आहे. भगवान गड त्यांच्या पाठीशी भक्कम उभा आहे."
दरम्यान, धनंजय मुंडे यांच्यावर सुरू असलेल्या आरोपांवर मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी कडाडून विरोध केला आहे. त्यांनी महंत नामदेव शास्त्री यांना खडसावले की, "खुनासारख्या प्रकरणात महंतांनी बोलू नये. कोणत्याही गुन्ह्याला पाठिशी घालणे योग्य नाही."
👉👉 जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
धनंजय मुंडे यांनी मात्र सुरुवातीपासूनच आपला या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांनी म्हटले की, "भगवान गड माझ्या पाठीशी उभा राहिला आहे. मात्र, हत्याप्रकरणातील गुन्हेगारांना फाशीची शिक्षा व्हायला हवी. पण त्याऐवजी माझ्या राजीनाम्याची मागणी अधिक जोर धरतेय."
👉👉 हे देखील वाचा : उद्धव ठाकरे सेनेला कोकणातून आणखी एक धक्का बसणार
दरम्यान, राशपचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मात्र बीड हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्यावर दोषारोप करत आपले मत मांडले आहे. "मुंडे यांचा या प्रकरणात संबंध असून, त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे," असे ते म्हणाले.
संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांकडूनही सातत्याने न्यायाची मागणी होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात कोणीही वाचणार नाही, असा इशारा दिला असला तरी, अद्याप तपास पूर्ण झाला नाही. आतापर्यंत आठ जणांना अटक झाली असली तरी संतोष देशमुख यांच्या हत्येचा संपूर्ण उलगडा झालेला नाही.